शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षक राऊत गुरूवारी वसईत

By admin | Updated: August 10, 2016 02:30 IST

वसईतील जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत येत्या गुरुवारी वसईत येत आहेत.

वसई : वसईतील जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत येत्या गुरुवारी वसईत येत आहेत. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात राऊत जनतेला भेटणार आहेत. आयपी सीचे कलम १५४ नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक दखलपात्र गुन्ह्याची घटना घडल्यावर व त्याची खबर पोलीस स्टेशन मध्ये दिल्यावर, तात्काळ गुन्हा दाखल करून प्रकरण स्टेशन डायरीमध्ये घेणे अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. मात्र, वसई तालुक्यातील अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी याबाबत आपले कर्तव्य पार पाडत नसल्याचे दिसून येते. तक्रार करावयास गेलेल्यांना थांबा, साहेबांना विचारतो, अर्ज करा, सामनेवाले यांना बोलवून घेतो, चौकशी करतो, अशी उत्तर देऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. याबाबत जनतेच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यध्यक्ष मिलिंंद खानोलकर व भाजपाचे जेष्ठ नेते शाम पाटकर यांनी संबंधित पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची सुरुवात वसई पोलीस स्टेशन पासून करण्यात येणार होती.याची दखल शारदा राऊत यांनी घेतली आहे. त्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता वसईच्या अप्पर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात बसून संबंधितांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. (प्रतिनिधी)