शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचे काम पोलिस बंदोबस्तात; मनोरकर संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:04 IST

बंद पाडलेले खोदकाम पुन्हा सुरू, जमिनीची भरपाई अजून नाहीच

- आरिफ पटेल मनोर : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास पालघर जिल्हासह हालोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध असतांनाही एम एम आर डी ए ने सर्व नियम धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात सोमवारी काम सुरू केले. या रूपाने त्यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त शेतकरी व या योजनेच्या विरोधात लढणाºया संघटना तीव्र तीव्र संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.या आधी एमएमआरडीए ने पोलीस बंदोबस्तात जल वाहिनी टाकण्याच्या कामास सुरु वात करताच संतप्त शेतकºयांनी आक्रमक होऊन काळे झेंडे घेऊन, घोषणा देत काम बंद पाडल होते. तसेच खोदकामासाठी आणलेले पोकलेन मशीन माघारी घेणे एमएमआरडीए च्या अधिकाºयांना भाग पाडले होते.राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेली आहे त्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि आता त्या जमीनीमध्ये पाईप लाईन टाकण्याचे काम गैरप्रकारे होत आहे. कारण शेतकºयांची जमिनी मुंबई अहमदाबाद महामार्गासाठी संपादीत करण्यात आली होती. कायद्यानुसार ती संपादीत जमीन एकच कारणासाठी आहे परंतु त्या जमिनीचा ५ जून २०१३ ला गाव निहाय निवडा झाला होता त्या वेळी त्या मध्ये पान क्रमांक १६ मधील निवाडा पाहता संपादीत होत असलेली जमीन एकच प्रयोजनासाठी संपादीत होत आहे असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.परंतु त्या रस्त्याच्या बाजूला वनपट्टेधारक, शेतजमीनधारक, व वनजमीनचा समावेश आहे. शेकडो शेतकºयांना रस्त्या मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. वन विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही तरी त्यांचे अधिकारी झोपेत आहेत.अविनाश पाटील हे सामाजिक कार्यकर्ता म्हणाले की ढेकाळे ते दुर्वेस पर्यंत शेकडो शेतकºयांची जमीन रस्त्या मध्ये गेल्या आहेत त्याचा मोबदला दिला नाही अणि आता त्या जमिनीत सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाईन चे काम सुरू केले आहे. गोर गरीब शेतकºयांना पोलिसांचा धाक दाखवून बळजबरी सुरू आहे. जमिनीचा मोबदला मिळत नाही तो पर्यंत आम्ही संघर्ष करीत राहू आता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.महामार्गाच्या आर. ओ. डब्ल्यू. मधून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एमएमआरडीएला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडेप्रयत्न करू.-कुणाल शेंडे,अभियंता, एमएमआरडीए

टॅग्स :water transportजलवाहतूकVasai Virarवसई विरार