शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

‘सूर्या’ पाणीप्रश्नावर लवकरच बैठक, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष

पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजित उपोषणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी घेतली असून लवकरच ह्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पाटबंधारे विभागाने वाडा व जव्हार तालुक्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे ह्या उद्देशाने १९८० साली पिंजाळ प्रकल्प प्रस्तावित केला. मात्र , त्या विभागाने दिलेल्या दहा वर्षांच्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण न झाल्याने हा प्रकल्प रद्द झाला होता. मात्र, सरकारने नदीजोड प्रकल्पाच्या नावा खाली पिंजाळ प्रकल्पाचे पुनरु जीवन करून दमणगंगा नदीतून आणलेले ५०० दलघमी पाणी आणि पिंजाळ नदीचे ३०० दलघमी पाणी पाणी मुंबई ला नेण्याचा घाट घातला होता.या आधी पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर, मुंबईला नेण्यात आले होते. इथले सिंचन क्षेत्र घटवून, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकऱ्यांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर येथे १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते. त्यानंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताबा घेतला होता. सुमारे सात तास कार्यालयात ठाण मांडल्यानंतर आलेल्या जिल्हाधिकाºयांनी आमदार अमित घोडा, उपोषण कर्ते आणि विविध राजकीय पदाधिकाºयांशी चर्चा करीत मुख्यमंत्र्यांच्या भेटी साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आ. घोडा ह्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुख्यमंत्र्याच्या भेटीचे प्रयोजन करण्याची विनंती केली होती. त्यांनी स्वत: संघर्ष समितीचे ब्रायन लोबो, जितू राऊळ आदीं सोबत २३ मार्चला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रश्नाची माहिती माझ्या पर्यंत आली असून लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.मनोर : सूर्या प्रकल्पातील पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरार या भागाला देण्यासाठी एमएमआरडीए मार्फत सुरु करण्यात आलेले काम उपोषणकर्त्यांच्या भूमिकेमुळे थांबविण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबधितांना दिले आहेत. सध्या हे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कोर्टामध्ये असून या किचकट प्रश्नावर तेथूनच पुढील रणनिती ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये शिवसेनेकडून भूमिका घेतली गेल्याने भाजपाच्या गोटात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.जिल्हातील डहाणू,वाडा, विक्र मगड तालुक्यातील सूर्या व पिंजाळ नदीचे पाणी उचलण्याच्या कामाला नांदगावतर्फे मनोर, चिल्हार, वाडे, वैती असे अनेक ठिकाणी एमएमआरडीएमार्फत पाईप लाईन चे काम सुरू करण्यात आले होते. ते बंद करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन सुरू केले होते. सुर्या व इतर धरणाच्या पाणी प्रश्ना बाबत मुख्यमंत्र्या सोबत झालेल्या बैठकीनंतर काय निर्णय होते ते ४ एप्रिल रोजी कळणार असून त्या नंतरच पुढील प्रक्रिया ठरणार आहे असे नारनवरे म्हणाले.