शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये उन्हाळी भात पीक कापणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 07:02 IST

आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत.

- राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुक्यात सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच; परंतु उन्हाळी हंगामातसुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड गावात भात पिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत. आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून भात कापणीला सुरुवात केली आहे.यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकाची पुरती वाट लावली. भात पीक तयार होण्याच्याच काळात पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भात पिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भातशेतीची लागवड केली. या वर्षी उन्हाळी भात पिकात तरी आपला खर्च भरून निघेल या आशेवर शेतकरी आहेत.यंदा उन्हाळी भात पीक थोड्या फार प्रमाणात चांगले आले आहे. झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले. त्यासाठी त्यांनी भात लागवडीच्या वर्षानुवर्षे अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने अंदाजे २५ ते ३० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी केली आहे. आता भात पीक कापणीस आले आहे.या भागातील शेतकºयांना यंत्राच्या साहाय्याने उन्हाळी भातशेती लागवड प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यांत्रिक पद्धतीने पीक लागवड कशी करतात याचे मार्गदर्शन वेळोवेळी शेतकºयांना कृषी विभागाकडून देण्यात आले.-प्रभाकर सांबर, कृषी सहायक, सजनपावसाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळी भातशेतीतून मोठ्या अपेक्षा आहेत. भातशेती कापणीस तयार झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे भातकापणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. हाताशी आलेले भात पीक वाया जाऊ नये म्हणून आम्ही शेतकºयांनी कुटुंबाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत भात पीक कापणीस सुरुवात केली आहे.- सेवक सांबरे, उन्हाळी भात पीक लागवड केलेले शेतकरी, सजन गाव

टॅग्स :palgharपालघर