शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: September 3, 2016 02:18 IST

भार्इंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून वैभवी पाटील (२७) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली असून

मीरा रोड : भार्इंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून वैभवी पाटील (२७) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली असून सायंकाळपर्यंत तिचा शोध लागलेला नव्हता. खाडीत उडी मारण्याआधी तिने आपल्या वडिलांना फोन करून दीड वर्षाच्या मुलीचा सांभाळ करा, असे सांगितले. सासरच्या जाचाला कं टाळून वैभवीने हे पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वैभवी ही नालासोपारा येथे राहते. तिचे वडील, भाऊ हे वसईला राहतात. भार्इंदर पश्चिम खाडीकिनाऱ्यावर बसवण्यात आलेल्या बाकड्यावर वैभवी येऊन बसली. गणेश विसर्जनासाठी मंडपाचे काम सुरू होते. मात्र, रडणाऱ्या वैभवीची कुणी साधी चौकशीही केली नाही. तेथील बोटचालकास वसईला जाणार का, असे विचारले. पण,त्याने जाण्यास नकार दिला. त्यामुळे ती रेल्वे पुलाच्या दिशेने निघून गेली आणि तिने पुलावरून खाडीत उडी मारली. हा प्रकार मंडपाचे काम करणाऱ्या कामगाराने पाहिला. त्याने अन्य जणांना सांगितले. उडी मारण्यापूर्वी वडील मोरया पाटील यांना फोन केल्याने तेही भार्इंदर खाडीकिनारी आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. जवळपास दोन तास जवानांनी खाडीत तिचा शोध घेतला असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)