शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

श्वानाला मारहाण, गुन्हा दाखल, व्हिडीओ सोशल मिडियावर झाली व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:25 IST

घटना सीसीटीव्हीत चित्रित : सोशल मिडियावर झाली व्हायरल

बोर्डी : या शहरातील जनार्दन आर्केड इमारतीच्या आवारात बसलेल्या श्वानाला लगतच्या जलसा कॅफेचे विशाल वाडेकर यांनी बेदम मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरु द्ध कारवाई करण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे. ही घटना सिसिटीव्हीत कैद झाल्यानंतर सोशलमीडियावर क्लिप व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी तीव्र झाली.

शुक्रवार १५ फेब्रुवारीच्या दुपारी या इमारतीच्या आवारात एक श्वान बसला होता. त्यावेळी लगतच्या जलसा कॅफेचे विशाल वाडेकर याने तेथे येऊन त्याला दंडुक्याने मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्याने श्वान विव्हळू लागला. मात्र हे पाहून वाडेकरला पुन्हा जोश आला. काही पावले माघारी जाऊन त्याने पुन्हा त्याच्याकडे मोर्चा वळवून जोरदार पाच प्रहार केले. त्यावेळी अन्य व्यक्तीने येऊन त्याला थांबविण्याचा प्रयत्नही केला. अन्यथा जीव घेतला गेला असता. ही संधी साधून जीव मुठीत घेऊन जखमी श्वानाने तेथून पळ काढला. हा प्रकार सिसिटीव्हीत रेकॉर्ड झाला असून त्याची क्लिप सोशलमीडियावर फिरू लागली. त्यामुळे वाडेकर यांच्या असंवेदनशील वर्तणूकीबद्दल टीकेची झोड उठली. त्यानंतर शॅरन नाजमी (राहणार, कंक्र ाडी) आणि विवेक जयाल (केटीनगर) यांनी वाडेकर विरुद्ध कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन डहाणू पोलीस ठाण्यात दिले आहे. दरम्यान नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे कळताच वाडेकरने तत्काळ सोशलमीडियाचा आधार घेत घडलेल्या कृत्याबद्दल सार्वजनिक माफी मागितली. हा भटका कुत्रा वारंवार कॅफेत शिरत असल्याने राग अनावर झाल्याने हा प्रकार घडल्याचा उल्लेख त्याने केला आहे.याबाबत कारवाई करण्यासाठी लिखित निवेदन प्राप्त झाले आहे. जखमी श्वान आढळल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.-जनार्दन परबकर,पोलीस निरीक्षक,डहाणू पोलीस ठाणे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार