शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर येथे होणार - कुलगुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:02 IST

१०० हेक्टर जागा लागणार; दिनेश कांबळे, किरण सावे समन्वयक

- हितेन नाईक पालघर : ७२० कि.मी.चा प्रदीर्घ किनारा लाभलेले मुंबई विद्यापीठ हे जगातले एकमेव विद्यापीठ असावे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित नवनवीन अभ्यासक्रमासह अ‍ॅक्वाकल्चर सेंटर पालघरमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पालघर मध्ये व्यक्त केला.मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालया जवळ सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर सातत्याने प्रयत्नशील असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गुरु वार (१३ जून ) रोजी उपकेंद्राची जागा निश्चित होण्याच्या दृष्टिकोनातून डॉ.पेडणेकर यांनी पालघर जिल्ह्याचा दुसऱ्यांदा दौरा केला. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची भेट घेवून सुमारे १०० एकर जागेच्या उपलब्धतेबाबत आणि उपकेंद्राच्या उभारणी संबंधीच्या तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सफाळे आणि माहीम येथील प्रत्यक्ष जागांवर जाऊन पाहणी केली.विद्यापीठाच्या उपकेंद्राची प्रशासकीय इमारत लवकरात लवकर सुरु करण्याची निकड लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात देण्याची प्रक्रि या जलद गतीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी कुलगुरुंसोबत विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुनिल पाटील, माजी कुलसचिव डॉ.दिनेश कांबळे, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा.अशोक ठाकूर, प्राचार्य डॉ.किरण सावे उपस्थित होते. विद्यापीठ उपकेंद्र मार्गी लागण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ.दिनेश कांबळे आणि स्थानिय समन्वयक प्राचार्य डॉ.किरण सावे यांची नियुक्ती कुलगुरूंनी केली.जिल्हाधिकाºयांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय या उपक्र मांतर्गत सातपाटी येथे मत्सव्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक अभ्यासक्र म सुरु करण्यासाठी संबंधित शिष्टमंडळाने सातपाटी येथील सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केली. यावेळी या संस्थेने विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुलगुरु डॉ.पेडणेकर यांनी सोनोपंत दांडेकर, चाफेकर महाविद्यालयाला भेट दिली व चर्चा केली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ