शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीत बससाठी विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:45 IST

आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे.

तलासरी : आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे. खिशात पैसे नसल्यामुळे प्रवास खर्च परवडत नाही. म्हणून मंगळवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मानव विकास च्या बससाठी आंदोलन केले.गावातील शाळा सातवी आठवी पर्यंत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका परिसरातून तलासरीत येतात. परंतु या विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बसेस उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. रिक्षा टेम्पोतून यावे लागते. यात त्याचा वेळ, पैसा वाया जातो. तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या बसेस साठी शाळा व्यवस्थापनाकडून पंचायत समिती तलासरीला पत्र व्यवहार केला आहे. मात्र, पंचायत समितीचे शिक्षण विभाग व डहाणू एस टी डेपो चे अधिकारी चालढकल करीत असल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. या वेळी अधिकाऱ्यांनी तलासरी भागात बसेस सुरू करण्याचे अश्वासन दिलेस्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया च्या वतीने मंगळवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी मानव विकासच्या बस साठी तलासरी नाक्यावर रस्त्यावरच ठिय्या दिला व बसेस सुरू करत नाही तो पर्यंत रस्त्यावर बसण्याचा निर्धार व्यक्त करताच अधिकारी वर्गाची धावाधाव झाली.विद्यार्थ्यांनी या वेळी बसेस नसल्याने त्रास व आर्थिक ओढाताण होत असल्याचे सांगितले. या वेळी डहाणू डेपोचे सुनील वाघ यांनी आपली बाजू मांडताना पंचायत समिती कडून आलेले प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले आहेत. पण अजून मंजुरी न आल्याने मानव विकासच्या बसेस सुरू झाल्या नसल्याचे सांगितले. तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सदानंद जनाथे यांनी शाळांकडून आलेले प्रस्ताव डहाणू डेपोला पाठवीत असतो पण त्याच्या कडून कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. जुलै महिन्यात दिलेले प्रस्तावावर कार्यवाही केली असती तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसायची वेळ आली नसती असे त्यांनी सांगितले.आजच्या घडीला तलासरी भागात मानव विकासच्या सहा बसेस रस्त्यावर धावत आहेत पण त्या फक्त मुख्य रस्त्यावरून असल्याने त्यांचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. बरेच विद्यार्थी खेड्या पाड्यावर राहत असल्याने त्यांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागते. तेव्हा ते मुख्य मार्गावर येतात.तलासरीतील शाळे साठी कासा चारोटी आंबोली पासून ते आच्छाड, डोंगरी, सायवन पासून विद्यार्थी येत असतात. मात्र, या मार्गावर बसेस धावतच नसल्याने विद्यार्थ्यांना रिक्षाने यावे लागते. तसेच आच्छाड, चारोटी आंबोली या गावातील मुली सकाळी लवकर येवून रिक्षा, जीप पकडतात. यामुळे शिक्षणाची गळती वाढत आहे.