शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

By admin | Updated: June 4, 2017 04:08 IST

या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना

- लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना भयभीत केले होते. दोन दिवसांमध्ये आलेल्या वादळाने सर्वसामान्याचे मोठे नुकसान केले आहे़ कुणाचे ६०, कुणाचे ३० तर कुणाचे २० ते कुणाचे ७० पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यामध्ये घरातील धान्यांच्या गोण्याच्या गोण्या भिजून गेल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान झालेले आहेत़ तर अनेकांच्या घरावर झाडे उन्मळून पडल्याने घरे जमीनदोस्त झाली आहेत़तर दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाबरोबर आलेला वादळी वारा व विजेने एकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहे़ २ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आदिवासी शेतकरी सोन्या देवजी कुवरा (४५) रा़ शिळ पैकी दांडेकरपाडा हा इसम घराच्या ओटयावर आणखी दोघांसोबत गप्पा मारत असतांना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला़ मात्र दैवयोगाने बाजूस असलेले इतर दोघे बचावले या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे हलविण्यांत आले़ मात्र सोन्या कुवरा यांचा अगोदरच मृत्यू झाला होता इतर दोघांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली व त्याप्रमाणे अहवाल सादर केला व नैसर्गीक आपत्ती म्हणून सोन्या देवजी कुवरा यांच्या कुटुंबियांना तत्काळ ४ लाखाची मदत मंजूर केली. ही रक्कम त्यांच्या पत्नीचे खाते बॅकेमध्ये उघडून त्यात जमा करण्यांत येणार आहे़तसेच इतर सवादे, खांड या गावातील काही लोकांच्या घरासमोरील झाडांवर देखील वीजा पडून त्यांना धक्का बसला असल्याने त्यांचीही चौकशी तहसिलदारांनी त्यांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले असून त्यांना आता कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगीतले़शेतकऱ्यांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून शासनाच्या जिआरप्रमाणे जर ज्या भागात घराचे नुकसान झाले आहे़ त्याठिकाणी किमान ६५ मि़ मि़ पावसाची नोंद होणे आवश्यक आहे अशा ठिकाणचे पक्के घर पडल्यास ५,२००, साधे घर पडल्यास ३,४०० व साधेघर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यास ४,२०० याप्रमाणे भरपाई मिळते़गेल्या दोन वर्षामध्ये अशा प्रकारचा वादळी वारा व पाऊस व वीजा कोसळणे अशी नैसर्गीक आपत्ती आली नव्हती, यावर्षी दोन दिवसांत विक्रमगडमधील वातारवणच बदलून मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे़ झाडे, वीजेचे पोल पडण्याचे वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ़विजेच्या धक्याने घाबरलेले खांड व सवादे तसेच शिळ येथील काही नागरिंकांच्या घरी जाऊन मी चौकशी केली व त्यांची विचारपूस करुन उपाय योजना करण्यात आली आहे़ तसेच शिळ पैकी दांडेकरपाडा येथील सोन्या देवजी कुवरा हा इसम विजेच्या धक्याने मृत्यू पावला असून त्यांच्या कुंटुंबांला नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाकडून तत्काळ ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यांत आली आहे व लवकरच ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे़-सुरेश सोनवणे, तहसिलदार विक्रमगड