शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चलनबंदीने वसईत झोडण्या थंडावल्या

By admin | Updated: November 12, 2016 06:20 IST

८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ५०० व १००० हजार रुपयांच्या चलन बंदीचा परिणाम वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला झाला असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात कापण्या व भात झोडण्या

सुनील घरत, पारोळ/वसई८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ५०० व १००० हजार रुपयांच्या चलन बंदीचा परिणाम वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला झाला असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात कापण्या व भात झोडण्या थंडावल्या आहेत .त्यामुळे दरसाल आस्मानी संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागत आहेत सुलतानी संकटाचा सामना. १५० ते २०० हेकटर मध्ये घेतल्या जाणार्या व वसई तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाच्या सुगीचा जोर धरण्याच्या काळात झालेल्या चलन बंदीचा परिणाम शेतीवर आहे. या भागात शेतमजुरांची मजुरी ही रोजच्या रोज रोखीने होत असते . मात्र त्यांना मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे प्रचिलत सुट्टे चलन नसल्याने व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा मजूर स्वीकारत नसल्याने शेतकऱ्यांच्या अंतिम टप्प्यातील भात कापण्या व झोडण्या थंडावल्या आहेत . काही तुरळक ठिकाणी कापण्या व झोडण्या सुरु आहेत ती केवळ मजुरांच्या मजुरीची उधारी म्हणून सुरु आहेत. पूर्वीच्या काळी मजूर मजुरी म्हणून शेतात पिकलेले धान्य स्वीकारत होते . मात्र आता रोखीने मजुरीचे व्यवहार होत आहेत. तसेच पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामाला लागणारे बियाणे,खते,औजारे,औषधे आदी लागणारे साहित्य खरेदी व शेती नांगरणीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वसई तालुक्यातील सहकारी व राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती वसईचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.