शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

सांडपाण्याच्या पाइपलाइनचे काम रोखले

By admin | Updated: February 28, 2016 04:05 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत. आता थेट समुद्रात ७.१ किमी दूरवर प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येऊन मासेमरिचा गोल्डन बेल्ट नष्ट करण्याचा कुटिल डाव एमआयडीसी, एम्पीसीबीकडून आखला जात असल्याच्या निषेधार्थ आज दांडी, आलेवाड़ी, नवापुर इ. भागातील शेकडो मच्छीमार महिला-पुरूषांनी एकजूट दाखवित पाईपलाईन चे काम बंद पाडले. तारापुर औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून दर रोज सुमारे ७० ते ७५ दशलक्ष लीटर प्रदूषित सांडपाण्याची निर्मिती होत असून त्या पैकी फक्त २५ ते ३० दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्यावर एम्पीसीबीच्या सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया केली जाते. जास्त क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राची उभारणीचे काम सुरु असल्याने उर्वरित ४० ते ४५ दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्याची विल्हेवट खाड़ी, खाजणे, समुद्र, खुली गटारे इ. द्वारे केली जात असल्याने दांडी, नवापुर, आलेवाड़ी, मुरबे, सातपाटी, वडराई, इ.भागातील खाडयाचे पाणी काळे पिवळे पडून मासे, शिंपले इ. मत्स्य संपदा जवळपास नष्ट झाली आहे. या विरोधात अनेक निवेदन, मोर्चे आंदोलने काढूनही काही कंपन्यावर प्रदूषण मंडळाकडून थातुरमातुर कारवाई केली जाते होती. कडक कारवाई केल्यास कंपन्या बंद पडून रोजगार बंद पडेल अशी भीति स्थानिकांना कंपन्यांच्या हितचिंतकांकडून दाखविली जात आहे.नावपूरच्या समुद्र किनारी ११० कोटी रुपयांच्या योजने अंतर्गत १ हजार मिलीमीटर व्यासाचे एचडीपीई पाइप एकमेकांना जोडून समुद्रात नेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती,अखिल मांगेला समाज परिषद्, पोफरण दांडी मच्छीमार सहकारी संस्था, इ.संघटनांनी या पाइपलाइन टाकण्याास विरोध दर्शविला होता. तरीही याची कुठलीही गंभीर दखल न घेता या कामाचा ठेका घेणाऱ्या एस एमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले होते. त्या मुळे काम थांबविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या.जिल्हाधिकारी, एमआयडीसी, प्रदुषण मंडळ यांच्याशी प्रथम चर्चा करा त्या नंतरच कामाला सुरुवात करा. असे कळवले असताना जोपर्यंत पर्यायी मार्ग निघत नाही तो पर्यंत ठेकेदाराने काम सुरु करू नये असे पत्र पोफरण संस्था अध्यक्ष विजय तामोरे, जी. प. सदस्य तुळसीदास तामोरे, सेनेचे सुधीर तामोरे, भावेश तामोरे इ. नी दिले. या पत्रावर नवापूर ग्राम पंचायतीचे सदस्य संतोष पागधरे, खगेश पागधरे, इ. सह रोहित बारी, विजय बारी इ. नी आक्षेप घेतला. याच पाइपलाइन संदर्भात टीमा मध्ये जनसुनवाई झाली असताना आम्हाला कुणीही पाठिंबा दर्शवल नाही. आम्हाला मिळणारा ४० लाख रुपयांचा टॅक्स आता सर्वांच्या डोळ्यावर येत असल्याच्या प्रतिक्रिया त्यानी व्यक्त करुन गावातील पाइपलाइनचे काम आम्ही बंद करू देणार नाही असा पवित्रा नवापुर मधील काही निवडक मंडळींनी घेतल्या नंतर दोन गटात बाचाबाची झाली. (वार्ताहर)