शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झरी येथे दगडफेक

By admin | Updated: June 14, 2016 00:24 IST

नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत

तलासरी : नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हातून गेल्याने माकपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप तर ग्रामपंचायत जिंकल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून माकपाला दररोज हिणवण्याचा प्रकार होत असल्याने रविवारी त्याचा विस्फोटच झाला.भाजपाच्या व माकपाच्या दोन गटांत धुमसत असलेल्या रागाचे पर्यवसान रविवारी संध्याकाळी ७ वाजेदरम्यान झरी वाल्ह्यईपाडा येथे तुफान दगडफेकीत झाले. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील ११ महिलांसह २४ जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम तलासरी ग्रामीण रुग्णालयात, नंतर अधिक उपचाराकरिता सिल्वासा येथील विनोबा भावे रु ग्णालय तसेच वापी येथील हरिया रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत अनेकांची डोकी फुटली . या प्रकारात २४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी दगडफेकीच्या प्रकरणात आपल्यालाही अटक होईल, या भीतीने अनेक जण डोकी फुटूनही रुग्णालयात आले नसल्याने जखमींचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. या दगडफेकीत जखमी झालेले सुरेश वरठा, दसमा वरठा, विजय वरठा, राजेश पाचलकर, लखमी धनारे, सुभाष बारात, राजेश गोधाले, संपत घाटाल, सुनील गोधाले, प्रकाश वरठा, रंधाई वरठा, शंकर गोवारी, श्यामू गोधाले, दिलीप भीमरा, तुळशी गोधाले, विनता भीमरा, धर्मी गोधाले, पिंकी गोधाले, जनकू वळवी, शीला गुरोडा, माली गुरोडा, रामी पाचलकर, शर्मिला गोधाले, सुनील दळवी अशी जखमींची नावे असून याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)