शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण रोखण्यात राज्य शासन अपयशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 02:51 IST

तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत.

मोखाडा : तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत ५३ बालके मृत्यूच्या दारात आहेत यामधील जून महिन्यात २ बालमृत्यू कुपोषणाने झाला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे परंतु गेल्या २५ वर्षात कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नसतांना सरकार आपली जबाबदारी झटकण्यात माहीर आहे हे काही नवीन नाही, अशी टीका पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतच्या २७ जूनच्या अंकात प्रसिद्ध होताच त्यांनी मोखाड्यातील कुपोषित भागाचा दौरा करून पहाणी केली यावेळी त्यानी बालमृत्यू झालेल्या पिंपळगाव व शिरसगाव येथे भेट देऊन आदिवासी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.शासनाच्या सर्व योजना फक्त जाहीराती पुरत्या व घोषणांसाठीच असाव्यात कारण मोखाडा तालुक्यात तीनशे पेक्षा जास्त बालके कुपोषणाने ग्रस्त आहेत. कुपोषण रोखण्यास शासन अपयशी असल्याचे ते म्हणाले शहरात अनेक समारंभात अन्न वाया जात असते आणि दुर्गम भागात काही बालकांना पुरेसे पोषक अन्न मिळत नाही योग्य व पुरेशी औषध मिळत नाहीत . हा विरोधाभास संपणार कधी असा सवाल त्यांनी केला.त्यांच्या सोबत मधुकर चौधरी, बळवंत गावित, अशोक पाटील, लक्ष्मण मोंढे , गंगाराम वारखेडे सदाशिव झोले गणपत डबाली जमशेत फकीरा, दुर्वेस कंसारा, विशाल पागधरे, चंदर गोंडके व ग्रामिण भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बालमृत्यू झालेले परिवार हलाखीतगरीबी व जगण्याचा संघर्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळला बाळा लाखन ह्या तीन महीने बावीस दिवसाच्या मृत्यू झालेल्या बालकाच्या घरी त्यांनी भेट दिली असता मृत बालकाचे वडील मंगेश लाखन दु:ख बाजूला ठेवून कामावर गेले होते. आई शेतावर गेली होती. व तीन भावंडे,े आजोबा झिम्या लाखन व काका भाग्या लाखन हे सांभाळत होते. या गावाजवळच दोन तीन किलोमीटर वर वाशाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तरीही बालमृत्यू होत आहेत कुपोषण थांबण्याचे नाव घेत नाही. स्नेहा बांडे ह्या फक्त दोन महीने अकरा दिवसाच्या बालमृत्यू झालेल्या बालीकेच्या घरी गेले असता असे समजले की तिच्यावर जव्हार कुटीर रुग्णालयात १६ दिवस उपचार सुरू होते व नंतर सोडून देण्यात आले. ते पुढे म्हणाले जिल्ह्यातील कुपोषणा विरोधात कॉग्रेस पक्ष सतत आवाज उठवत राहील.या विषयाची माहीती कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण विरोधी पक्ष नेते राधाकृष्णन पाटील व खासदार हुसेन दलवाई याना दिली असूूून ते या भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर आपला पक्ष सभागृहात आणि बाहेरही सातत्याने व प्रभावी आवाज उठवेल असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार