शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात भात पेरण्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:23 IST

बियाणांची थैली ५० रुपयांनी महागली; मजुरांची टंचाई, ट्रॅक्टरचे भाडेही महागले

पारोळ : वसई तालुक्यात रोहिणी कोरडी गेल्या नंतर मृगात पावसाने हलकी सुरु वात केल्याने शेतकऱ्यांंनी भात पेरणीला सुरु वात केली. मात्र दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण असून पाऊस पडला नाही तर पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या तालुक्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भाताच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. त्यासाठी लागणारे बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांंची कृषिसेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे . तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टर मालकांकडे खेटे मारणे सुरु झाले असून तो लागलीच मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरवात झाली असून पेरणीसाठी लागणारे सुधारित व संकरित भात बियाणे, खते ,औषधे ,यांची जुळवा जुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत . मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºयां महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्या सह लागणारी औजारे, नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे भाव साधारण ५ ते १५ टक्के वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत .मागील वर्षी च्या तुलनेत भात बियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रु पयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत . वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुण राजाचा लहरीपणा, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भात शेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांंचे म्हणणे आहे .यामुळे तालुक्यातील अनेक शेतकºयांंनी भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे.वसई तालुक्यात ८६४७ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड होत असून मागील वर्षी ७७३३ हेक्टर मध्ये भात लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी हेक्टर मागे २५८० किलो भात पिकाचे उत्पादन झाल्याची कृषी विभागाने माहीती दिली. पण या वर्षी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.