शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हायवे वरील अनधिकृत दुभाजक बंद करण्यास आयआरबीचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:30 IST

अपघातांना बसणार आळा; पोलिसांचा पुढाकार

नालासोपारा : लोकमतच्या ६ जूनच्या अंकात वाढते गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले असल्याच्या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आयआरबीच्या अधिकार्यांनी तलासरी ते वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील २९ अनिधकृत दुभाजक असल्याची यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे अनिधकृत दुभाजक बंद करण्यास आयआरबीने सुरुवात केली आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा ब्रिज ते विरार बावखळ पाड्यापर्यंत वालीव पोलीस ठाण्याची हद्द असून यादरम्यान अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती विजय चौगुले यांनी आयआरबीच्या व्यवस्थापनाकडून मागितली होती. त्यानुसार आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वालीव पोलिसांना २९ दुभाजक अनधिकृत असल्याची माहिती दिली होती.मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वर अनेक हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात असल्याने येणाºया ग्राहकांच्या सोयीसाठी आणि प्रवेशासाठी मार्ग बनवून त्यांनी नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाने ठेवलेल्या अधिकृत दुभाजकाऐवजी अनिधकृत दुभाजक मोठ्या प्रमाणात निर्माण केले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर अपघात होत असून त्यांची संख्या वाढली आहे. ती घटविण्यासाठी ते बंद करण्याची कारवाई पोलीस करीत आहेत.‘तो’ दुभाजक अनिधकृतचदहीसरच्या कांदरपाडा येथे राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (४१) आणि सीमा विश्वकर्मा (३८) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी 28 मेच्या रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी मोटार सायकल रस्ता क्र ॉस करण्यासाठी दुभाजकावर थांबले असताना अचानक समोर आलेल्या एका अनोळखी इसमाने दोघांवर अ‍ॅसिड फेकले होते. जिथेही घटना घडली तो दुभाजक अनधिकृतच होता.