शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वसईत किवाच्या मासेमारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:13 IST

वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे.

पारोळ : वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे. गणेशोत्सवानंतर या गावठी माशांना बाजारात मागणी वाढली असून त्यातून चांगला दर मिळत असल्याने हे रोजगाराचे एक नवे साधन निर्माण झाले आहे.जून महिन्यात प्रजननक्षम वल्गन चढलेल्या माशांनी सोडलेल्या बिजाचे आता मोठ्या स्वरुपातील माशांमध्ये रूपांतर झाले असून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. हे मासे शेतात, ओहोळात, नाल्यात आणि नदीत सापडत असून त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर भात शेती लागवडीनंतर सध्या कमी असलेल्या शेतीच्या कामांमुळे पांग टाकून, झोळणीने, भुसा वापरून, गळ सोडून तसेच किव मांडून मासेमारी करताना दिसतात. यातून ते चांगल्या प्रकारे रोजगार कमवत आहेत. अशा प्रकारे पकडलेले मासे हे ताजे व चविष्ट असल्याने ते खरेदी करण्यासाठी खवय्येही लागलीच मिळत आहेत. त्यामुळे एका दिवसाला एकाला पाचशे ते हजार रुपयांची कमाई होत असल्याचे मासेमार सांगत आहेत.यंदा वसईत चांगला पाऊस झाल्याने शेतात, डबक्यात, नदी-नाल्यात, ओहोळात माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. ते पकडून त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर मासेमारी करत असून त्यांच्या हाताला काम मिळत असून खर्चायला चार पैसेही मिळत आहेत.