शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वसई, विरारमध्ये टँकरचा सुळसुळाट; गळती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:37 IST

वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पारोळ : वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत बेदरकार टँकर चालकांकडून शहरात १०० हून अधिक मोठे अपघात झाले असून त्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. टँकरचालकांना गर्दीच्या वेळेत रस्त्यावर बंदी घालणारा प्रस्तावही धूळ खात पडला आहे. वसई फाटा ते वसई, नालासोपारा फाटा ते सोपारा, शिरसाड ते विरार या मार्गावर गळक्या टँकरच्या वाहतुकीमुळे सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळे तच हे मार्ग ओले होत असल्याने अपघाताची टांगती तलवार आजमतिीला ही नागरिकांच्या मानेवर आहे.वसई-विरार शहरात ६०० हून अधिक टँकर आहेत. एकटयÞा नालासोपारा शहरात २५० टँकर आहेत. मात्र टँकरचालकांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालावा अशी मागणी आहे.टँकरना बंदी घालण्याच्या प्रस्तावाचे काय झाले?मागील पाच वर्षांत टँकरचालकांकडून शहरात एकूण १०५ अपघात झाले आहेत. ज्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ६८ जणांना गंभीर दुखापत होऊन त्यातील काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर टँकरमधून पाणी सांडणे नित्याची बाबत आहे. मात्र पाण्याच्या वाहतुकीस सदोष टँकरचा वापर केला जातो.वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी टँकरना शहरात बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार सकाळी ८ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत टँकरचालकांवर शहरात वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार