शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यमाळ केंद्र ठरले तंबाखूमुक्त; मोखाड्यात पटकावला पहिला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे.

खोडाळा : मोखाडा पंचायत समिती अंतर्गत सूर्यमाळ केंद्रातील १०० टक्के शाळांनी तंबाखूमुक्त अभियानाचे सर्व ९ निकष पूर्ण करून तालुक्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्र ठरण्याचा मान सूर्यमाळ केंद्रास प्राप्त झाला आहे. सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी मोखाडा तालुक्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्र म्हणून सूर्यमाळ केंद्र घोषित केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक दिवसीय ऑनलाइन मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली होती.  यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आणि मोखाडा तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पाढंरे, शिक्षण विभागाचे विस्तारधिकारी रामचंद्र विशे यांनी लवकरात लवकर सर्व शाळा तंबाखूमुक्त करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, सूर्यमाळ केंद्रातील सर्व शाळांनी सर्वच्या सर्व निकष पूर्ण करत, सूर्यमाळ केंद्राला पालघर जिल्ह्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्राचा बहुमान मिळवून दिला आहे.

मोखाडा पंचायत समिती अंतर्गत सूर्यमाळ केंद्रातील १०० टक्के शाळांनी तंबाखूमुक्त अभियानाचे सर्व निकष पूर्ण केले आहे. याकरिता मोखाडा तालुक्यातील राजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विशे यांनी विशेष परिश्रम घेतले.