शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सापाचे वास्तव्य थेट एअर कंडिशनरमध्ये, नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 19:18 IST

उन्हाची दाहकता कमालीची वाढली असून अंगाची होणारी लाहीलाही टाळण्याकरिता थंडाव्याचा आश्रय घेतला जातोय.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी -  उन्हाची दाहकता कमालीची वाढली असून अंगाची होणारी लाहीलाही टाळण्याकरिता थंडाव्याचा आश्रय घेतला जातोय. दरम्यान माणसांप्रमाणेच साप ही त्याला अपवाद नसून थेट पाच सापांचे एअरकंडिशनर मध्ये वास्तव्य असल्याचा प्रकार डहाणूत समोर आला आहे.तालुक्याच्या जामशेत गावात युनियन बँकेच्या शाखे समोर जयेश जानी यांच्या घरातील एअरकंडिशनर मध्ये सापांचे वास्तव्य असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेकडे आली. याकरिता सर्पमित्र सागर पटेल घटनास्थळी दाखल झाले.भिंतीवर लावलेल्या एअरकंडिशनरची पाहणी केली असता, तेथे गॅस पाईपच्या छिद्रात रुखई नावाचे तीन बिनविषारी साप सर्पमित्रांना दिसल्यावर तत्काळ इलेक्ट्रिशनला बोलावून हे उपकरण उघडण्यात आले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून अधिवासात सोडण्यात आले. तर या घटनेला एका तासाचा अवधी उलटल्यानंतर, पुन्हा त्याच उपकरणात साप असल्याची माहिती घरमालकांनी दिल्याचे सर्पमित्र सागर पटेल यांनी दिली. यावेळी पुन्हा दोन सापांना बाहेर काढल्याचे तो म्हणाला. एकाच जातीचे एकूण पाच साप असून त्यापैकी एक मादी आहे. या सापांचा सध्या प्रजनन काळ असल्याने मादीच्या मागून त्यांनी प्रवेश केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.या घटनेनंतर तालुक्यात आश्चर्य आणि कुतूहल या संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान घर आणि कार्यालयात विजेची उपकरणं वापरताना आणि त्यांची निगा राखताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. "रुखई जातीचे पाच बिनविषारी साप एयरकंडिशनर मध्ये आढळले, सध्या त्या सापांचा प्रजनन काळ असून मादीच्या मागे ते आले असावे. अशा उपकरणात साप आढळने दुर्मिळ बाब आहे."