वसई : विरार पूर्वेस कळंभोण गावात राहणाऱ्या प्रतिक पाटील (१०) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे त्यास मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.प्रतिक हा सोमवारी आपल्या शेतावरील घरात झोपेत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याच्या पालकांनी त्वरीत त्यास पारोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्यास भिवंडी येथील रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे तो अत्यावस्थ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मुंबईत हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)वेळेत उपचार झाले असते तर...ग्रामिण भागातील आरोग्य केंद्रात सर्पदंशावर प्रतिरोधक लस व औषधे असणे बंधनकारक आहे. मात्र सर्पदंश झाल्यानंतर पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसल्याने पुढची खर्चीक व वेळखाऊ धावाधाव झाल्याने प्रतिक वाचू शकला नाही असे ग्रामस्थांनी लोकमतला सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर त्वरीत योग्य ते उपचार होत नसल्यामुळे आजवर अनेकांचे बळी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सर्पदंशाने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
By admin | Updated: August 25, 2015 22:45 IST