शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या बिघाडाने तस्करीचा भंडाफोड

By admin | Updated: May 6, 2017 05:17 IST

सागाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या टेम्पोंमध्ये बिघाड झाल्याने त्याला जंगलातील आड रस्त्यावर तसेच ठेऊन तस्कर फरार झाले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : सागाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या टेम्पोंमध्ये बिघाड झाल्याने त्याला जंगलातील आड रस्त्यावर तसेच ठेऊन तस्कर फरार झाले. मात्र, हा प्रकार एका गावकऱ्याच्या लक्षात आल्याने वनविभाग खडबडू जागे झाले आणि त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचा प्रकार भाताणे वनपरिक्षेत्रामध्ये घडला आहे. वसई व पालघर तालुक्याच्या वेशीवरील जंगलामध्ये हा प्रकार घडल्याने या भागात लाकडांच्या तस्करीचा राजरोसपणे धंदा सुरु असल्याचा भंडाफोड झाला आहे. जागृत गावकऱ्याच्या खबरीमुळे वनविभागाला जाग आली असली तरी त्यांच्या ढिसाळ कार्यपद्धती यामुळे उघडी पडली आहे. ३ मे च्या सकाळी दरशेत हद्दीतील काही जागृत नागरिकांनी एम एच ०५ के ७८२४ हा टेम्पो अत्यंत दुर्गम असलेल्या वसई व पालघर जिल्ह्याच्या वेशीवरील दारशेत गावाच्या हद्दीतील कच्च्या रस्त्यावर बंद स्थितीत उभे होते. त्यामध्ये लाकडी ओंडके भरलेले असल्याची खबर भाताणे रेंजला एका गावकऱ्याने कळवली. त्यानंतर वनक्षेत्रपाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याची टीम त्या ठिंकाणी धडकली. हा भाग हा दुर्गम असला तरी आमची नेहमीच टेहळणी सुरु असते. त्यामुळे आजपर्यंत अनेक लाकूड तस्करी उघड करण्यात आम्हाला यश आले आहे. या भागातील लाकूड तस्करी रोखण्यासाठी गस्ती फेऱ्या वाढवल्या आहेत अशी माहिती वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी लोकमतला दिली.