शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

स्किमरद्वारे एटीएमकार्डची क्लोनिंग करणारी दुक्कल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:10 IST

दोघेजण आगाशी बोळींज परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नंडोरे : बँकेच्या ग्राहकांची माहिती मिळवून बेकायदेशीर क्लोनिंग एटीएम कार्ड बनवून त्याद्वारे रक्कम काढणाऱ्या चंद्रगुप्त छोटेलाल मौर्य (२७) व तिमिर जितेंद्र मारू (२७) रा. ग्लोबल सिटी विरार (पश्चिम) यांना अर्नाळा पोलिसांनी मंगळवारी ओलांडा नाक्यानजीक मंगळवारी अटक केली. त्यांना बुधवारी वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.दोघेजण आगाशी बोळींज परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गस्तीदरम्यान सापळा रचला. हे दोघेही ओलांडा परिसरात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता स.पो.नि राकेश पगारे, स.पो.फौ. प्रभाकर पवार, दिगंबर सांगळे व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना अटक केली. या दरम्यान त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून पोलिसांना एटीएमसदृश्य कार्ड सापडले आहेत. अधिक माहिती घेतली असता ते दोघे एकाच ठिकाणी कामाला असल्याचे समजले. तसेच ते कामच्या ठिकाणी येणाºया ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे असलेल्या स्किमरद्वारे (माहिती गोळा करणारे यंत्र) ते बेकायदेशीर चोरी करत असत. त्या द्वारे त्यांच्याकडे असलेल्या ग्राहकांच्या माहितीच्या आधारे ते बनावट व क्लोन केलेले एटीएम बनवीत व त्यामार्फत बँकेच्या एटीएममधून ग्राहकाच्या नावाने पैसे काढत असल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे.पोलिसांनी या दोन्ही आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना बनावट एटीएम कार्ड बनविण्याचे यंत्र (स्किमर), रायटर व लॅपटॉप जप्त केले आहे. या दोघांविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डी. वाय. एस. पी. जयंत बजबळे करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी