शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत शुकशुकाट

By admin | Updated: November 10, 2016 02:53 IST

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

डहाणू/बोर्डी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयानंतर सुरू झालेले सोशलमीडियावरचे मेसेज वॉर दिवसभर सुरू होते. प्रत्यक्षात पर्यटन, बाजार, वाहतूक तसेच रोजंदारी या मध्ये कमालीची अस्वस्थता दिसून आली. पेट्रोल पंप वगळता सर्वच बाजारावर मंदीचे सावट पसरले होते.केंद्र सरकारने देशहितासाठी पाचशे आणि हजार रु पयांच्या चलनी नोटा बंद केल्याचे सांगून देशबांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र डहाणू तालुक्यात पाहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यन्त नोटा बंद केल्याचा निर्णय अफवा नसल्याची खात्री केल्यानंतर बुधवारी पहाटेपासून अनेकांनी किराणामालाचे दुकान, भाजी मार्केट, दूधवाला, रिक्षाचालक आदि. ठिकाणी बंदी आलेल्या नोटा वटवून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमामुळे सजगता आल्याने अशा नोटा घेण्यास नकार देण्यात आला. दिवसभर बँक, एटीएम मशीन बंद असतांनाही नागरिक संपर्क साधत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. डहाणू आणि बोर्डी या पर्यटन स्थळी आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. प्लास्टीक करन्सीचा फायदा ग्रामीण भागात न झाल्याने परगावतील पर्यटकांनी घराची वाट धरली. त्याचा परिणाम हॉटेल तसेच ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्रावर दिसून आला. ग्राहकांकडे सुट्टे पैसे असल्याची खात्री करूनच सेवा देण्याची हमी रिक्षाचालक, दुकानदार आणि घाऊक बाजारातील व्यापारी घेत होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला असून मजूरवर्गाला रोजंदारीचे पैसे देण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. मजुरी न मिळाल्याने शेतमजुरांनी कामावर येणे थांबवल्यास नाशवंत कृषी मालाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व बागायतदारांनी व्यक्त केली आहे.दरम्यान तालुक्यातील विविध पेट्रोल पंपावर पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. मात्र नोटांच्या बदल्यात तेवढ्याच किमतीचे पेट्रोल घेण्याचे बंधन असल्याने फक्त या व्यवसायावर तेजीची झळाळी दिसून आली. मात्र नोटा स्वीकारण्यासह संबंधितांचे ओळखपत्र, संपर्क क्र मांक नोंदवताना पेट्रोल पंपचालकांची दमछाक झाली. दहा, पन्नास आणि शंभर रु पयांच्या नोटा असणाऱ्यांकडे कुतुहलाने पाहण्यात येत होते. संधीसाधूंन्भ् पाचशे तसेच हजारच्या नोटैमागे शंभर रुपये कमी देत सुट्या पैशांचा व्यवहार करून आर्थिक फायदा उठवला. एकंदरीत आर्थिक उलाढालीवर मंदीचे सावट दिसून आले. (वार्ताहर)