शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

By admin | Updated: November 15, 2016 04:10 IST

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो

जव्हार : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर येथील अनेक खाती पालघर येथे हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत.आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही खाते स्थलांतरीत केले जाणार नाही असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु, तसे न झाल्याने जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. पालघर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार जव्हारच्या कार्यालयातूनच चालवा अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचा कार्यभार कायम ठेवावा अशी मागणी येथील आदिवासींनकडून केली जात आहे. १९९२-९३ साली जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली होती. तर अनेक कुपोषित बालके मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणी या गावाला तात्काळ भेट देवून येथील समस्या जाणून घेवून जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले होते. पुरवठा व रोहोयो या दोन खात्यांचा कार्यभार जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालत असल्याने, येथील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या काही प्रमाणात सुटत होत्या. मात्र ही खाती पालघरला स्थलांतरीत करण्यात आल्याने आता समस्या जैसे थे रहात आहेत. त्यामुळे किमान पुरवठा विभाग व रोजगार हमी योजना असा दोन खात्यांचा कार्यभार तरी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चालावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्र्यांनाही त्यांच्या समाजबाधंवांनी साकडे घातले आहे.(वार्ताहर)