शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभमंगल कर्ज योजने’ला आॅफलाईनचा फटका, शेतकरी झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:49 IST

शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते.

कल्याण : शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते. मात्र या कर्जासाठी शेतकºयाच्य सातबारावर तारणासाठी जो बोजा चढवावा लागतो. त्याची प्रक्रिया आॅनलाइन ठेवली आहे. आॅनलाईनचा सर्व्हर अनेक वेळा डाऊन असतो. त्यामुळे शेतकºयांची कर्ज प्रकरणे मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या.राज्य सरकारने शेतकºयांच्या सातबाºयावरील फेरफाराची प्रक्रिया आॅनलाईन केली. त्याला तीन वर्षे उलटून गेली. शेतकºयांच्या मुलामुलींच्या लग्नकार्यासाठी शुभमंगल योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी तारण ठेवावे लागते. घर अथवा त्याच्याकडे असलेल्या जमिनीचा काही भाग तो तारण ठेवू शकतो. याच प्रक्रियेला सातबारावर बोजा चढविणे असे म्हटले जाते. ही प्रक्रिया आॅनलाईन आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्ज प्रकरणे लवकर मार्गी लावणे, त्यात पारदर्शकता आणणे हा सरकारी यंत्रणांचा मुख्य उद्देश आहे. मात्र याच उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने आॅनलाईन बोजा चढविण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिमाणी मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेण्यात अडचण उद््भवते. यापूर्वी बोजा चढविण्याचे काम तलाठ्यांकडे होते. आता प्रक्रियाच आॅनलाईन असल्याने तलाठी लेखी बोजा चढविण्याची प्रक्रियेत कानावर हात ठेवतात. सातबाºयावर थेट बोजा चढवून दिला जात नाही. शेतकºयाच्या शेतजमीनीत अनेक हिस्सेदार असतील, तर बोजा चढविण्याची प्रक्रिया अधिक किचकट व डोकेदुखीची होते. शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातही हस्तक्षेप करता येत नाही. आॅनलाईन प्रक्रियेऐवजी तलाठ्यामार्फत त्याची पूर्तता केल्यास शुभमंगल योजनेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतात. अथवा सर्व्हर डाऊन होणार नाही. तो सातत्याने नीट चालत राहील, याची काळजी सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे. ती घेतली जात नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. सध्या लग्नसराई आहे. अनेक शेतकºयांकडे सोयरिक जुळलेली आहे. साखरपुडे झालेले आहेत. शुभमंगल योजनेतून कर्ज मिळेल या आशेवर त्यांनी लग्नाची जुळवाजुळव केली आहे. पण वेळेत कर्जच मिळाले नाही, तर लग्नाचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न घेसरचे गजाजन मांगरुळकर यांनी केला.