शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

तारापूरच्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:57 IST

मोठ्या प्रमाणात घातक घनकचरा व इतर रसायने अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात साठविणाऱ्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

- पंकज राऊतबोईसर : मोठ्या प्रमाणात घातक घनकचरा व इतर रसायने अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात साठविणाऱ्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी अचानक केलेल्या पहाणीत ही बाब उघड झाली होती.तारापूर एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यातून निघालेला घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे बंधनकारक असतांनाही खर्च वाचविण्यासाठी तो मुख्य रस्त्याच्या कडेला वा सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे टाकला जात असल्याच्या घटना मागील महिन्यांमध्ये लोकमतने उघडकीस आणल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा खडबडून जागी झाली व तिने घातक घनकचºयाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. तीमध्ये तारापूर येथील काही कारखान्यांची तपासणी केली असता सपना डिटर्जंट, मेशा फार्मा , निरव सिल्क व इस्टमन केमिकल्स या कारखान्यांपैकी काही मध्ये घातक घन कचरा तर एका कारखान्यात घातक रसायन साठवून ठेवल्याचे समोर आले.या पैकी सपना , मेशा या दोन कारखान्यात मोठया प्रमाणात घनकचरा आढळून आला असून तो त्यांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कडे विल्हेवाटी करीता पाठविण्यास म.प्र.नि. मंडळाने सांगितले असून इतर कारखान्यांची पारदर्शकपणे तपासणी करून घातक घनकचरा साठविणाºया कारखान्यांवरकठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.>तपासणीत सातत्य हवेजोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ तपासणीत सातत्य ठेवत नाही व तीमध्ये दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई करीत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही. नाटकी कारवाई होत असल्याने तिचा धाक कारखान्यांना उरलेला नाही अशी चर्चा खुलेआम सुरू आहे.