शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गटशिक्षणाधिकाऱ्यांसह १३ जणांना कारणे दाखवा

By admin | Updated: December 30, 2016 04:16 IST

शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र मांक १ मधील संरक्षक भिंतीचे लोखंडी गेट कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर दोन

वाडा : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र मांक १ मधील संरक्षक भिंतीचे लोखंडी गेट कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी जबर जखमी झाल्याची घटना घडली होती. तिला जबाबदार धरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसह सात जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. आज पालघर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी वाडा गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व विस्तार अधिकारी ज्ञानदेव निपुर्ते यांच्या सहित तेरा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, वाडा शहरातील शिवाजीनगर भागा लगत असलेल्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा वाडा क्र मांक१ व प्राथमिक शाळा वाडा क्र मांक २ या शाळा एकाच ठिकाणी भरत आहेत. या शाळांच्या संरक्षक भिंतीचे जीर्ण झालेले लोखंडी गेट कोसळून प्राथमिक शाळा वाडा क्र मांक १ मधील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणार्या तन्वी धानवा या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला . तर शैलेश संजय चव्हाण व अंजू शिवकुमार प्रसाद हे विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यातच या घटनेचे विधानसभा अधिवेशनातही पडसाद उमटल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले होते. त्याचप्रमाणे या घटनेसंदर्भात शाळा प्रशासनाविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पहाणी केली होती. त्यानंतर केलेल्या प्रशासकीय चौकशीत एका केंद्रप्रमुखासह सात जणांना निलंबित केले होते. (वार्ताहर)आरोप तेच फक्त कारवाईत केला बदलविद्यार्थ्यांची सुरक्षा विषयक काळजी न घेणे, जेवणाच्या मधल्या सुट्टीत घरी जाणे, धोकादायक बांधकाम वरिष्ठांच्या निदर्शनास न आणून देणे, धोकादायक ठिकाणांपासून खेळण्यास विद्यार्थ्यांना परावृत्त न करणे आदी कारणांसाठी काहींना निलंबित केले आहे. साधारण याच मुद्द्यावरून गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व विस्तार अधिकारी ज्ञानदेव निपुर्ते यांच्यासह महेश गोतारणे, कविता ठाकरे, धनश्री पाटील, माधुरी पवार, निलम पाटील, प्रतिभा गोतारणे, सुप्रिया पाटील, वैशाली पष्टे, संगिता ठाकरे, मनीषा जाधव व सुनील मोरे अशा एकूण तेरा शिक्षक व शिक्षिकांना जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तिचे उत्तर सात दिवसांत द्यायचे आहे.