शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार शिगेला : वसई काँग्रेसमध्ये दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:35 IST

तरखड ग्रामपंचायत निवडणुकीतील आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने वसई तालुक्यातील काँग्रेसमधील दुही चव्हाट्यावर आली आहे.

शशी करपेवसई : तरखड ग्रामपंचायत निवडणुकीतील आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने वसई तालुक्यातील काँग्रेसमधील दुही चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटाकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचारही सुरु करण्यात आला आहे.तरखड-आक्टण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी आघाडी करीत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर वसई तालुका (ग्रामीण) काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांनीही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दोन्ही गटाकडून आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा करून आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वसईत काँग्रेसमध्ये असलेली दुही चव्हाट्यावर आली आहे.बिपीन कुटीन्हो यांचेच पॅनल अधिकृत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील आणि दत्ता नर यांनी केला आहे. कुटीन्हो यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते. तसेच काँग्रेसने जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी आघाडी केली आहे. कुटीन्हो यांचेच पॅनल अधिकृत असल्याचे माहिती प्रदेश सचिव विजय पाटील यांनी दिली. आमचेच पॅनल अधिकृत असून आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, असे कुटीन्हो यांनी सांगितले. पाटील आणि नर यांनी कुटीन्हो यांची बाजू घेत प्रचारात भाग घेण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष राम पाटील यांनी आपलेच पॅनल अधिकृत असून त्याला पक्षाची मान्यता असल्याचा दावा केला आहे. कुटीन्हो यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार उभे केले आहेत. त्यांना काँग्रेसची मान्यता नाही, असे पाटील यांनी सांगितले. तर तरखड ग्रामपंचायत निवडणुकीत तालुका अध्यक्ष राम पाटील यांचेच पॅनल अधिकृत असल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे (ग्रामीण) अध्यक्ष केदार काळे यांनी दिली. पाटील यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वसई विरार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमणिक डिमेलो मैदानात उतरले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे दोन पॅनल आणि त्यासाठी दोन्ही गटाकडूनवसई विरार शहरातील नेते प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवार नक्की कोण याबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस