शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

दहा शिवप्रेमींकडून गडाची स्वच्छता, अशीही शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:31 IST

अशेरीगडाचा २८१ वा विजयदिन : प्लास्टिकचा कचरा, दारुच्या बाटल्यांचा खच

वसई : किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत जिल्ह्यातील अशेरीगडावर २८१ व्या अशेरीगड विजयदिनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मुख्य गडाच्या सदरेवर मानवंदना, अशेरीदेवी तांदळा संवर्धन, गडावरील प्लास्टिक कचरा व दारूच्या बाटल्या स्वच्छता मोहीम हे असे विविध उपक्र म दुर्गमित्रांकडून राबविण्यात आले.

किल्ले वसई मोहिमेच्या एकूण १० प्रतिनिधींनी अशेरीगडावरील मुख्य सदरेवर पूजन करून तेथे भगवा जरिपटका फडकवून मानवंदना दिली. यावेळी ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तसेच, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील भारतीय जवानांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी उपस्थितांना अशेरीगडाचा प्राचीन इतिहास व संवर्धनाची गरज यावर मार्गदर्शन केले. यावेळी दुर्गमित्रांनी गडाच्या प्राचीन गुंफा परिसरातील प्लास्टिक कचरा व दारूच्या बाटल्या एकत्रित गोळा केल्या. अशेरीगड जिल्हा पालघर खोडकोना गाव मनोर प्रांत येथील श्री आदिशक्ती गडदेवता अशेरीदेवीच्या मूळ तांदळा स्वरूप स्थळाची गेल्या कित्येक वर्षांपासून नैसिर्गकरीत्या झीज झालेली होती. तसेच स्थानिक भाविकांनी त्यावर पूजनासाठी वापरलेल्या हळद, कुंकू, अगरबत्तीचा धूर, जुने हार यामुळे मूळ तांदळा बऱ्यापैकी धूसर झालेला होता. दुर्गमित्रांनी नैसिर्गक साहित्यांचा वापर करून देवीचा मूळ तांदळा सुशोभित केला. यावेळी कोळसा काजळी, नारळाच्या शेंडीचा भुसा, तेल, सेंदूर यांच्या संमिश्र उपायातून तांदळा मूळ स्वरूपात नीट केला. यावेळी देवीच्या तांदळ्यास कानफुले, मंगळसूत्र यांनी सुशोभित करण्यात आले. यावेळी दुर्गमित्र मनोज पाटील यांनी देवीला घंटा अर्पण केली.किल्ले वसई मोहीमे अंतर्गत २००७ सालापासून सुरू असणारी अशेरीगड विजयदिनाची परंपरा अविरत सुरू आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्र मांनी गडाचे एकएक इतिहास कण जपण्यासाठी दुर्गमित्र प्रयत्नशील आहेत.- डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहिम इतिहास अभ्यासकसातत्यपूर्ण श्रमदान मोहिमा व विजयदिन परंपरेच्या माध्यमातून अशेरीगड संवर्धनासाठी किल्ले वसई मोहीम परिवार प्रयत्नशील राहील.- आकाश जाधव, किल्ले वसई मोहिम (दुर्गमित्र) 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीVasai Virarवसई विरार