शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:02 IST

संडे अँकर । पालिकेला दिला दत्तक : इतिहास जागवण्यासाठी विविध कार्यक्रम

मीरा रोड / भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी असलेली जयंती ऐतिहासिक अशा घोडबंदर किल्ल्यावर महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असल्याची माहिती महापौर डिम्पल मेहता व उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सरकारने हा किल्ला महापालिकेला दत्तक दिला असून शिवरायांचा इतिहास किल्ल्यात जागवण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत.

मीरा-भार्इंदर शहरातील घोडबंदर गावात असलेला हा किल्ला व चौक येथील धारावी किल्ला हे दोन्ही शहराच्या ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहेत. यातील घोडबंदर किल्ला हा सरकारच्या राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेंतर्गत महापालिकेने दत्तक घेतला आहे. या किल्ल्याची डागडुजी व सुशोभीकरणासाठी महापालिकेने पाच कोटी ४७ लाखांची तरतूद केली असून त्यातील ५० लाख प्रवेशद्वारासाठी राखीव ठेवले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली असून त्यासाठी एक कोटी ८१ लाख ६८ हजारांची तरतूद केली आहे. किल्ल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यासाठीचे सल्लागार व कंत्राटदारही त्याच विभागाने सुचवलेले आहेत. किल्ल्याला पूर्वीच्या कंत्राटदाराने सिमेंटचे प्लास्टर करून टाकले होते. ते काढून चुनाखडीसह वनस्पतींचा वापर करून तयार केलेल्या मिश्रणाचा उपयोग डागडुजीसाठी केला जात आहे. किल्ला सुमारे साडेचार एकरमध्ये असून आजूबाजूची १५ एकर सरकारी जागा ताब्यात आली असून त्यावर शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. घोडबंदर गावाच्या मुख्य मार्गावर महामार्गाजवळ ३० फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून त्यासाठी दोन कोटी ९२ लाखांची मंजुरी महासभेने दिली आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार केले जाणार आहे.घोडबंदरच्या या पुरातन किल्ल्याच्या गतवैभवाची माहिती शहरवासीयांना व्हावी म्हणून यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ल्यात महाराजांचा दरबार साकारला जाणार आहे. त्याआधी गावातून शोभायात्रा काढली जाणार आहे. तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके होतील. पोवाडे, गोंधळ, वाघ्यामुरळी, शौर्यगीते यासह पारंपरिक कोळी, आदिवासी नृत्य सादर केली जाणार आहेत. या वेळी महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक तसेच पत्रकारांचा फेटे बांधून सत्कार केला जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार