शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

त्या रिक्षांविरोधात शिव वाहतूक सेनेचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:13 IST

शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिव वाहतूक सेनेच्यावतीने विरारमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन तास रिक्षा वाहतूक ठप्प झाली होती.

वसई : या शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिव वाहतूक सेनेच्यावतीने विरारमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन तास रिक्षा वाहतूक ठप्प झाली होती.या परिसरात बेकायदा रिक्शा वाहतूक जोरात सुरु आहे. त्याचबरोबर कालबाह्य रिक्षा, विना परवाना, विना लायसन्स, विना बॅज रिक्शा चालवणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवसाय करणाºया रिक्षा चालकांना बसतो आहे.हे रिक्षाचालक प्रवाशांशीही गैरवर्तन करीत असतात. यावर शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक निकम आणि शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख दिलीप पिंपळे यांनी आवाज उठवून विरार शहरात हे चक्का जाम केले.चंदनसार येथे झालेल्या आंदोलनामुळे विरार पूर्वेकडील रिक्षा वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. कालबाह्य आणि अ़नधिकृत रिक्षा जप्त करून भंगारात मोडीत काढण्यात याव्यात. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात यावेत. दर तीन महिन्यांनी वाहतूक पोलिसाची नाक्यावरून बदली करण्यात यावी. स्टँडवरील बेकायदा रिक्षा कायम बंद करण्यासाठी दर आठवड्याला भरारी पथकाद्वारे तपासणी केली जावी, अशाही मागण्या मोर्चेकºयांनी केल्या आहेत.यानंतर निकम आणि पिंपळे यांनी परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहतूक सेनेच्या मागण्या मान्य केल्यात. बेकायदा वाहतूकीविरोधात लगेचच कारवाई सुरु केली जाईल, अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली.