शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरितांच्या पाल्यांचा ‘आसरा’; डहाणूत अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:51 IST

विद्यार्थ्यांना घडविण्याचा उपक्रम

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तालुक्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने पोटापाण्यासाठी गावोगावी भटकणाऱ्या आदिवासी समाजातील नागरिकांना घरदार सोडून वर्षातील आठ महिने स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट सुटून बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डहाणू तालुक्यात पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे‘आसरा’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये वर्षभर रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने पावसाळ्यातील चार महिने वगळता ही कुटुंबे वीटभट्टी, बांधकाम व्यवसाय, मासेमारी तसेच शेती बागायतीत मजुरीसाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून जावे लागते. ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी जशा शाळा चालविल्या जातात, तसा प्रकार इथे दिसत नाही. किंवा शासनाने त्यासाठी राबविलेले उपक्रम तितके प्रभावी ठरत नाहीत. एकदा पालकांसोबत रोजगार मिळवण्यासाठी फिरण्याची सवय लागली की, त्या विद्यार्थ्यांचे मत शाळेच्या चार भिंतीत रमत नसल्याने शाळाबाह्य विद्यार्थी, गळती आदी प्रश्न निर्माण होऊन त्यांचे शिक्षण अर्ध्यावर संपते. त्यामुळे बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. तालुक्यातील अशा स्थलांतरित पालकांच्या मुलांनी शाळा सोडून जाऊ नये यासाठी पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे ‘आसरा’ हा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. या कालावधीत अशा विद्यर्थ्यांना त्याच गावात अन्न आणि निवाºयाची सुविधा आसरा केंद्रात उपलब्ध होणार आहे. यासाठी गावातील विधवा तसेच वृद्धांच्या मदतीने हे केंद्र चालविले जाणार असून त्यांना फाउंडेशनतर्फे आर्थिक मोबदला दिला जाणार आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात या तालुक्यातील दाभोण गावच्या पिलेनापाडा, सखदेवपाडा आणि पाटीलपाडा या तीन जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. संस्थेचे स्वयंसेवक आणि शिक्षकांनी सर्व्हे केला असून आतापर्यंत ४५ विद्यार्थ्यांचे अर्ज योजनेसाठी प्राप्त झाले आहेत. तर आसरा सेंटर सुरू करण्यास २० इच्छुकांनी सहमती दर्शविली आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षणाअभावी अंधारमय असते. त्यांना योग्यवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याचा हा उपक्र म आहे.- योगेश सावे, अध्यक्ष, पेन्स सहयोग फाउंडेशन