शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बांधकामे हटविण्यास सुरुवात; जेएनपीटी-नवी दिल्ली कॉरिडोर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:39 IST

जेएनपीटी-नवी दिल्ली कॉरिडोर प्रकल्प : अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई

नालासोपारा : जेएनपीटी ते नवी दिल्ली कॉरिडोरकरिता नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाड्याच्या जमिनीतून रेल्वे जाणार आहे. या जागेवरील लोकांना रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच मोबदला दिलेला असून त्यांची घरे व अनधिकृत टपऱ्यांवर वसईच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर यातील अधिकाऱ्यांनी, तुळिंज पोलीस आणि जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने मंगळवारी सकाळच्या वेळी कारवाई केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा येथील सर्व्हे नंबर ७३, ८५, ९५, ५ यातून रेल्वे जाणार आहे. या जागेमध्ये ३०-४० कच्ची घरे असून या घरांमध्ये कोणीही राहात नाही.

तसेच अनधिकृत टपऱ्या आहेत. तसेच सर्व्हे नंबर ३ मध्ये सन २०१३ मध्ये अंदाजे १०० रूम असून ते त्या ठिकाणी राहात होते. हे अतिक्रमण काढण्याकरिता  मंगळवारी सकाळी मोहीम राबविली होती. या भूसंपादित जागेमध्ये राहणाऱ्या लोकांना यापूर्वीच मोबदला देण्यात आला होता. ही बांधकामे हटवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वसईच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २२ डिसेंबरला कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पाहिजे, म्हणून पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना पत्रव्यवहार केला होता.

तुळिंज पोलिसांनी या कारवाई दरम्यान दोन पोलीस अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी, पाच महिला पोलीस कर्मचारी निःशुल्क बंदोबस्त दिला होता. या विभागातील वसईचे सिव्हिल विभागातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी जी.बी. हेरोडे (४६) यांच्याकडून रीतसर माहिती घेऊन तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त दिला होता. त्यानुसार बिलालपाडा परिसरातील घरांसह अनधिकृत टपऱ्या यावर संपूर्ण बंदोबस्तात जेसीबीद्वारे कारवाई करून जमीनदोस्त केलेे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार