शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचे अंदाजपत्रक शिलकी

By admin | Updated: February 23, 2017 05:33 IST

मंगळवारी झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिलकी अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात

हुसेन मेमन/ जव्हारजव्हार : मंगळवारी झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिलकी अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. ही सभा सकाळी ११.०० वा. राजीव गांधी स्टेडीयम मधील तेंडुलकर पेव्हेलियन येथे झाली, यावेळी नगराध्यक्ष संदिप वैद्य, उपनगराध्यक्ष आशा बल्लाळ, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, नगरसेवक संजय वांगड, अमोल औसरकर, कांचनमाला चुंबळे व इतर नगरसेवक तसेच मुख्याधिकारी वैभव विधाते, नगर अभियंता बी.डी. क्षीरसागार व कमर्चारी वृंद उपस्थित होता.हे अंदाजपत्रक मुख्याधिकाऱ्यांनी थेट सर्वसाधारण सभेत सादर केले. कारण जानेवारी २०१७ मध्ये स्थायी समिती स्थापन झालेली नव्हती. त्यात जमा २० कोटी २७ लाख २७ हजार २१७ व खर्च १९ कोटी २८ लाख ११ हजार २१७ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यात ४ लाख ४२ हजार ७१७ रूपये शिल्लक राहणार आहेत. यंदा मालमत्ता करात कोणतीही वाढ सुचविलेली नाही. नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार किमान २२-२७ टक्के दराने मालमत्ता कर आकारता येतो. परंतु सध्या तो २४ टक्के असल्याने त्यात वाढ केलेली नाही. सन २०१७-१८ मध्ये एकत्रित करापोटी रू. ६७.७५ लाख, शैक्षणिक करापोटी रू. १८लाख, वृक्षकर ३ लाख, रोजगार हमी ३ लाख, एवढा कर वसूल होणे अपेक्षीत आहे. या करापैकी शिक्षण व रोजगार हमी कराचा भरणा शासनाकडे केला जातो, त्यासाठी नगर परिषदेस कराच्या वसुलीप्रमाणे ३.५ टक्के रिबेट मिळतो. पालिका क्षेत्रात मुख्य ठिकाणी छोटे-छोटे व्यवसाय करण्यासाठी जागा, टपऱ्या, गाळे कार्यालयासाठी इमारती भाडे तत्वावर दिलेल्या आहेत. तसेच परिषदेच्या संपूर्ण प्रशासकिय व लेखाविभागाकडील कामाचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्यासाठी नागरी सुविधा केंद्र अद्यावत करून नागरीकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच अग्निशमन सेवा सुरू करण्यात आली आहे.खडखड धरणातून पाणी पुरविणारी योजना अंतिम टप्प्यात शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता भासते त्यासाठी जयसागर धरणाच्या भिंतीचे मजबुतीकरण करून पाणी साठ्याचे क्षेत्रफळ वाढविल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. तसेच शहराला खडखड धरणातून पाणी पुरविणाऱ्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा लाभ लवकरच जव्हारकरांना मिळणार आहे. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात रू. ५० लाखांची तरतूद केलेली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी परिषदेला १०० वर्ष पूर्ण होत आहे.या सोहळ्याठी ५ लाखांची तरतूद आहे. पथदिव्यांसाठी नवीन पोल खरेदी करण्यासाठी आणि नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील डिव्हायडरवर उभारण्यासाठी पोल खरेदी करणे यासाठी १५ लाखांची व विद्युत खांबांवरील एल.ई.डी. दिवे खरेदीकरीता रू. ५ लाखांची तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्यासाठी २० लाख, नगर परिषदेसाठी सुसज्ज सभागृह बांधण्याकरीता ५ लाख, सूर्य तलावातील गाळ काढण्यासाठी ५लाख अशा तरतूदी करण्यात आले आहे. जव्हाची लोकसंख्या १५ हजार पेक्षा कमी असल्याने मान्य खर्चावर १०० टक्के शासकिय अनुदान मंजूर आहे. त्याकरीता एकूण तरतूद १ कोटी ८० लाख ८५ हजार तर शासकिय अनुदान १ कोटी ७५ लाख ५० हजार व नगर परिषद अनुदान २ लाख ३५ हजार अपेक्षित आहे.