शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत लैंगिक शिक्षण

By admin | Updated: September 7, 2016 02:26 IST

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

ठाणे : ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत. आता यापुढेही जाऊन किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी माहिती व्हावी, म्हणून त्यांना हे शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आठवी ते दहावीपर्यंतच्या ४९७५ विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या १२६ शाळा असून यामध्ये ३५ हजार ४२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता आठवी ते दहावीमध्ये यातील ४९७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे आरोग्यविषयक अवलोकन पालिकेने केले होते. त्यानुसार, त्यांना आता लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. कुमारवयात या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ही मुले व्यसन अथवा इतर तत्सम दुर्गुणांना बळी पडू शकतात. त्यामुळे त्यांना यापासून वाचवण्यासाठी आता महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना लैंगिक शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)