नवी मुंबई : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणा:या एका शिक्षकाला कोपर खैरणो पोलिसांनी अटक केली आहे. सदर पीडित मुलगा या शिक्षकाकडे पियानो शिकायला जात होता. त्याच्यावर या शिक्षकाने पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोपर खैरणो सेक्टर 3 येथे राहणा:या 12 वर्षीय मुलासोबत हा प्रकार घडला आहे. हा अल्पवयीन मुलगा त्याच परिसरात राहणा:या देवेंद्र दामेसा (55) याच्याकडे पियानो शिकण्यासाठी जात होता. त्यानुसार 1क् ते 15 ऑगस्ट दरम्यान देवेंद्र याने या मुलाला दारु पाजून त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. या मुलासोबत सलग पाच दिवस हा प्रकार सुरु होता. अखेर काही दिवसांपूर्वी सदर मुलाला रक्तस्नव होऊ लागल्याने त्याने आईला सदर प्रकाराची माहिती दिली. यावेळी घडलेल्या प्रकारावरुन आई ओरडल्याने हा मुलगा घर सोडून निघून गेला होता. यादरम्यान तो बांद्रा येथे एकटाच फिरत असताना एका समाजसेवकाला तो आढळला. सदर व्यक्तीने या मुलाला विश्वासात घेऊन बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोपर खैरणो पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग झाला होता. अखेर या गुन्ह्याप्रकरणी कोपर खैरणो पोलिसांनी देवेंद्र दामेसा याला अटक केली आहे. कोपर खैरणो रेल्वे स्थानक येथून त्याला बुधवारी सकाळी अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. देवेंद्र हा राहत्या घरीच मुलांना पियानो वाजवायला शिकवायचा तर रात्री भायखळा येथील बारमधील ऑर्केस्ट्रामध्ये पियानो वादकाचे काम करायचा. त्याच्यावर चाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने इतरही काही मुलांसोबत असा प्रकार केला आहे का याचा पोलिस तपास करीत आहेत.