शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लेट रेल्वेला सात हजारांचा दंड

By admin | Updated: September 15, 2016 02:08 IST

ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाला झालेला त्रास आणि ट्रेन उशिरा असूनही ती वेळेतच होती, असे खोटे उत्तर देणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम

ठाणे : ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाला झालेला त्रास आणि ट्रेन उशिरा असूनही ती वेळेतच होती, असे खोटे उत्तर देणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ७ हजारांचा दंड आकारला आहे.नवी मुंबई येथे राहणारे गोपाल बजाज यांनी २२ मार्च २०१३ रोजी ठाणे येथून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आॅनलाइन पेमेंटद्वारे नागपूर-सीएसटी ट्रेनची तिकिटे बुक केली. ५ मे २०१३ रोजी सायंकाळी ७.४० ही ट्रेनची वेळ होती. ट्रेन पकडण्यासाठी बजाज हे अमरावती येथे पोहोचले असता ट्रेन सुमारे ४ तास ३० मिनिटे उशिरा असल्याचे समजले. बजाज यांना दुसऱ्या दिवशी आॅफिसला वेळेत पोहोचायचे असल्याने त्यांनी दुसऱ्या ट्रेनचे १८० रुपयांचे तिकीट काढून जनरल क्लासने प्रवास केला. त्यानंतर, बजाज यांनी ट्रेन उशिरा असल्याबाबत ई-मेलद्वारे इंडियन रेल्वेला कळवून भरलेल्या तिकिटाचे ३०० रुपये परत मागितले.इंडियन रेल्वेच्या मॅनेजिंग डायरेक्टरने २३ मे २०१३ रोजी ट्रेन नेहमीच्या वेळेत चालत होती, असे बजाज यांना सांगितले. मात्र, बजाज यांनी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वेचे तेव्हाचे वेळपत्रक मिळवून ५ मे ला ट्रेन उशिरा म्हणजे रात्री १२.२५ ला पोहोचल्याचे दाखवले. त्यामुळे रेल्वेने खोटे सांगितले, असे मंचाने स्पष्ट केले. तर, आपण ही तक्रार मंचात दाखल केल्यावर रेल्वेने तिकिटाचे ३०० रुपये दिल्याचे बजाज यांनी त्यानंतरच्या युक्तिवादात नमूद केले आहे. रेल्वेने तिकिटाचे पैसे परत देऊन ट्रेन नियोजित वेळेपेक्षा सुमारे ५ तास लेट झाल्याचे मान्य केले आहे. त्यावरून, रेल्वेने बजाज यांना सदोष सेवा दिली असून तिकीट आणि माहितीच्या अधिकाराचा खर्च ३३० रुपये १२ टक्के व्याजाने द्यावा. तसेच नुकसानभरपाई आणि न्यायिक खर्च मिळून ७ हजार द्यावे, असे आदेश रेल्वेला ग्राहक मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)