शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

सात कोटी उशिरा, गणवेष नाही

By admin | Updated: June 17, 2016 00:41 IST

शाळेच्या पहिल्या दिवसात नवीन पुस्तके नवीन गणवेशाच्या आनंदात उडया मारत शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या २ हजार ५२० शाळामधील

- हितेन नाईक, पालघरशाळेच्या पहिल्या दिवसात नवीन पुस्तके नवीन गणवेशाच्या आनंदात उडया मारत शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या २ हजार ५२० शाळामधील लाखो विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. शासनाकडून गणवेशासाठी येणारे सुमारे ७ कोटीचे अनुदान वेळवर न आल्याने ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांवर मागच्या वर्षीचा जुना गणवेष घालूनच शाळेत जाण्याची वेळ आली आहे.पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील ४२३ शाळा, वसईमध्ये ५१५ शाळा, डहाणुमध्ये ४७१ शाळा, तलासरीमध्ये १७३ शाळा, वाडा तालुक्यात ३०० शाळा, विक्रमगड तालुक्यात २३६ शाळा, जव्हार तालुक्यात २४४ शाळा, मोखाडा तालुक्यात १५८ अशा २ हजार ५२० शाळा आहेत. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते परंतु ७ कोटीचा निधी वेळेवर उपलब्ध झाला नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच शाळेत जावे लागत आहे. या संदर्भात पालघर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सचीन पाटील म्हणाले की, अनुदान उशीरा आले. हा निधी राज्य शासनाने पुढील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत देण्याचे आदेश काढल्यास सर्व विद्यार्थ्यांची मापे घेणे, टेलर्सची निवड करणे, कापड खरेदी करणे, इ. ची टेंडर प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने जलद गतीने राबविता येईल. व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याआधीच गणेवेश वाटप करता येतील. (वार्ताहर) युनिफॉर्म मिळणार कधी?आता गणवेषासाठी लागणाऱ्या कपड्याची खरेदी होणार कधी, लाखो विद्यार्थ्यांची मापे घेणार कधी, ते शिवून मिळणार कधी? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जाणकारांच्या मते आता हे गणवेष बहुधा दुसऱ्या सत्रात म्हणजे दिवाळीच्या सुटीनंतर मिळण्याची शक्यता आहे.