शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बलात्काऱ्याला सुनावली जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:48 IST

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन गर्भपात करवला असल्याचेही या खटल्यादरम्यान समोर आले आहे.

पालघर - अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन गर्भपात करवला असल्याचेही या खटल्यादरम्यान समोर आले आहे.तो वसई येथे खाद्यगृह व्यवसाय चालवीत होता. या दरम्यान या पीडितेच्या आईशी त्याचे संबंध उत्तरप्रदेशातील त्याच्या गावात जुळले. तिच्या पतीपासून तिला ४ मुले आहेत. पतीची परिस्थिती वाईट असल्याने ती आपल्या मुलांसह तेथे विभक्त राहत होती. बबलू व तिचे संबंध जुळल्यानंतर त्याने तिला व तिच्या दोन मुलींना वसई येथे आणले व तो राहत असलेल्या ठिकाणी त्यांना ठेवले. तो त्यांचे पालनपोषण करणारा असल्याने त्या बबलूसोबत वसई येथील एका चाळीतील त्याचा खोलीत सोबत राहू लागल्या. त्यानंतर त्याची वाईट नजर मुलीवर पडली. त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या घटनेमुळे तिला गर्भधारणा झाल्याचे लक्षात येताच बबलूने तिला उत्तरप्रदेशात नेऊन तिथे गर्भपात करविला.त्यानंतर त्याने त्या मुलीला पुन्हा वसईत आपल्या राहत्या घरी आणले. या पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबतही असेच करण्याच्या इराद्याने त्याने तिच्यासोबत ती घरात झोपली असताना छेड काढली व तिच्यासोबत तसाच प्रकार करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मात्र तिने यास नकार देऊन या घटनेची माहिती आपल्या आईला व आजूबाजूच्यांना सांगितली. त्यानंतर या दोन्ही मुलींच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१४ ला तक्रार नोंदविली. बबलू यादव याच्याविरोधात पोलिसांनी पॉक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सुनावणी होऊन ही सजा त्याला ठोठावण्यात आली.१७ हजार रुपये दंडही ठोठावलाया प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक जी.बी.माळी व त्यांच्या सहकार्यांनी कशोशीचे प्रयत्न करून या प्रकरणातील दुवे शोधून भक्कम व सबळ पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले.या अनुषंगाने सरकारी वकील कादंबिनी खंडागळे यांनी वसई न्यायालयात बबलू यादव विरोधातील हा खटला २०१७ मध्ये सुरु केला. सरकारी वकील व वालीव पोलिस ठाण्याच्या भक्कम पुराव्यांमुळे पॉक्सो व इतर गुन्ह्याअंतर्गतचा आरोपी बबलू यादव यास शुक्र वारी वसई न्यायालयाने जन्मठेप व १७ हजार रु पये दंड अशी शिक्षा सुनावली. यातील फिर्यादी असलेली त्यांची आई गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयात आली आली नाही मात्र पोलिसानी तपासाअंती शोधलेले पुरावे,या दोन मुलींच्या सबळ साक्षीमुळे व वैद्यकीय अहवालानुसार या आरोपीस शिक्षा सुनावली गेली.

टॅग्स :Courtन्यायालयVasai Virarवसई विरार