शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाडा पंचायत समितीत भात बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:28 IST

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.

वाडा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकरी नाराज असून या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण देशभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मुंबईच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. झिनी, गुजरात ४ , गुजरात ११, रूपाली, दप्तरी, कर्जत ५, कर्जत ७, सुवर्णा, पूनम आदी भाताच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भात हे येथील मुख्य पिक आहे. असे असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे आताच्या घडीला कोणतेच बियाणे शिल्लक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी या विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. हजारो हेक्टर भातशेती येथे केली जात असतांना बियाणांचा येथे पत्ताच नसल्याने शेतकरी कृषी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाकडे बियाणे हे पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळते.शेतकऱ्याची होते लूटशेतकरी पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाºया बियाणांना पसंती देतात. मात्र यावर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे काही टन बियाणांची मागणी करूनही फक्त १५० क्विंटल कर्जत हेच बियाणे येऊन ते संपलेही त्यामुळे बियाणांसाठी शेतकरी कृषी विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाची उदासीनता यावरून दिसून येते. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांकडून महागडे बियाणे खरेदी करावे लागते आहे.१०९ वाणाचे १५ क्विंटल भात बियाणे आले होते.त्याचे वाटप शेतकºयांना करून झाले आहे. आता बियाणे शिल्लक नाही. - आर. आर. जाधव,कृषी अधिकारी, पंचायत समिती, वाडापावसाळ्याला आता काही दिवस उरले असताना पंचायत समिती सांगते आहे, की कृषी विभागाकडे बियाणांचा तुटवडा आहे. यावरून ती किती उदासीन आहे, हे दिसून येते.प्रशासन व कृषी सेवा केंद्रे यांचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग जास्त बियाणे मागवत नाही.याची चौकशी होणे गरजेचे आहे. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी नेते

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार