शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

संजय गांधी योजनेचा फज्जा ?

By admin | Updated: October 7, 2015 23:53 IST

जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर

जव्हार : जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने निराधारांना आर्थिक आधार देवून उतार वयात कोणावरही अवलंबून राहता येवू नये, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून ही योजना अमलात आणली. परंतु लालफितीच्या कारभारामुळे जव्हार तालुक्यात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.शासकीय नियमानुसार महसूल कार्यालयाने दरमहा पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अनुदानाची एकूण रक्कम याची महिन्याभरापूर्वी मंजुरी घेवून महिन्याच्या १ तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रकम जमा करायची असते. या योजनेतील लाभार्थ्यांला दरमहा ६०० रूपये अनुदान मिळते. जव्हार सारख्या अतिदुर्गम तालुक्यात आजही, अनेक भागात रस्ते पोहचलेच नाहीत त्यामुळे वयोवृद्ध, निराधार महिला आणि पुरूष पायपीट करून तर अनेकजण पदरमोड करून ६०० रूपयांच्या मानधनासाठी जव्हारला येतात. त्यांना जर महिन्याला ५ ते ६ वेळा यावे लागले तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च हा मानधनापेक्षा जात होतो. शासनाने प्रत्येक योजनेसाठी तालुका स्तरावर एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली आहे. तहसीलदार सचिव असलेल्या या कमिटीवर अशासकीय सदस्य देखील असतात, दरमहा तहसीलदार प्रत्येक तिची मिटिंग घेवून नवीन लाभार्थी निवड, काही आक्षेप आहेत का?, योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला वेळेवर मिळातो की नाही याबाबत आढावा घेत असतात. परंतु पालघर जिल्हा निर्मितीनंतर सर्व कमीटया बरखास्त झाल्यामुळे जव्हार तालुक्यात अनेक योजनांचा बोजवारा उडाला असल्यामुळे नवीन कमीट्या लवकरात लवकर नियुक्त कराव्यात अशी मागणी संजय गांधी योजना कमेटीचे माजी सदस्य श्याम राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)