शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका उपायुक्तांनाच जागोजागी आढळला बेकायदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:56 IST

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते . 

मीरारोड - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० डिसेम्बर पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहीम - २०२१ ची सुरवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या  प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या आहेत . त्यांच्यावर कार्यवाही करत ६० हजारांचा दंड वसूल  पिशव्या जप्त केल्या गेल्या . 

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते .  यंदा सुद्धा स्वच्छता सर्वेक्षण सुरु जाहीर होऊन ते ३० डिसेम्बर पर्यंत चालणार आहे . त्या अनुषंगाने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसरचे पालकत्व दिले आहे .

आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे , लोकांनी ओला - सुका करणे , प्लास्टिक पिशव्या कारवाई करायची आहे . अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथ वरील अतिक्रमण , बेवारस वाहने हटवायची आहेत . बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून शौचालये स्वच्छ - दुरुस्त ठेवायची आहेत . पाणी पुरवठा विभागाने खड्डे बुजवणे , मलनिःस्सारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत .  वृक्ष प्राधिकरण , शिक्षण , नगररचना विभागांना सुद्धा त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत . 

स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक , कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला . शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या लोकमत ने सातत्याने दिल्या होत्या . दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती . परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे . पानपट्टे यांनी प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या फेरीवाले आणि दुकानदार यांच्या कडून एकाच दिवसात ६० हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला . 

डॉ . संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, आरोग्य ) - प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे . शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . गेल्या वर्षी शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरा मुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे ओडीएफ ++ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता महापालिका प्रयत्न करणार आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार