शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणाऱ्या तुझ्या कष्टाला माझा सलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:52 IST

मी आज हजारो अनाथांची माय म्हणून सर्वत्र परिचित असली तरी माझ्या या कार्याला मोठा टेकू(पाठबळ) देण्यासह जिल्ह्यातील गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणा-या तुङया कष्टाला माझा सलाम आहे

पालघर : मी आज हजारो अनाथांची माय म्हणून सर्वत्र परिचित असली तरी माझ्या या कार्याला मोठा टेकू(पाठबळ) देण्यासह जिल्ह्यातील गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणा-या तुङया कष्टाला माझा सलाम आहे असे गौरवोद्गार अनाथांची माय म्हणून परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी निलेश सांबरे यांच्याबद्दल काढले.निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कला, क्रीडा नगरीत उभारलेल्या व्यासपीठावर मंगळवारी हजारो अनाथांची माय बनलेल्या सिंधुताई सपकाळ आणि पालघर-ठाणे जिल्ह्यातील वंचित घटकासाठी झगडणाºया निलेश सांबरे यांना जन्माला घालणारी माय असलेल्या भावनादेवी सांबरे या एकत्र उपस्थित होत्या.रस्त्यावरच्या कचºयात फेकलेल्या, कुत्र्यांनी लचके तोडलेल्या, विहिरीच्या कठड्यावर ठेवून पसार झालेल्या अशा हजारो मुलांचा सांभाळ मी आज करीत असून मी ४९ सुनांची सासू,मला २८२ जावई, ३५० गाईची आई बनली असून ७५० पुरस्कार, ४ राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मी गंभीर आजारी असताना माझ्या लेकरांनी मी मरू नये म्हणून अनाथालयात दिवा लावला, देवापुढे दिवा लावला की आई मरत नसते या भाबड्या समजुतीने लावलेला हा दिवा आजही सतत जळत आहे, कारण ह्या दिव्यातील तेल निलेशचे असल्याचे सांगून ही पणती कधीही विझणार नाही याची काळजी निलेश घेत असल्याचे सांगून परमेश्वर तुला नक्कीच दीर्घायुष्य देईल असा विश्वास सिंधुतार्इंनी व्यक्त केला.आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील विकासकामे शासकीय निधीचा वापर करून केल्यावरही आपण त्यांचा उदोउदो करतो. मात्र निलेश सांबरे यांनी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या फायद्याच्या पैशांमधून गरिबांसाठी उभारलेले रुग्णालय, जिल्ह्यात रुग्णवाहिनीचे पसरलेले जाळे, विनामूल्य शिक्षणासाठी उभारलेली शाळा-महाविद्यालय, उच्चशिक्षित अधिकारी बनविण्यासाठी उभारलेली अकॅडमी ह्या सर्वसामान्यांच्या हितासाठी निस्वार्थीपणे उभारलेले कार्य इथल्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असल्याचे स्पष्ट मत व्यासपिठावरून व्यक्त करण्यात आले.