शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात कमळांची विक्री

By admin | Updated: October 17, 2015 23:31 IST

नवदुर्गेला कमळपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या पुजेकरीता भक्तांकडून त्यांना असलेली मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील मंदिरासमोर

बोर्डी : नवदुर्गेला कमळपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या पुजेकरीता भक्तांकडून त्यांना असलेली मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील मंदिरासमोर कमळ फुलांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार तर भक्तांना फुल वाहिल्याचे समाधान मिळते आहे.कमळाचे फुल हे भारताचे राष्ट्रीय फूल असून धार्मिक, सांस्कृतिक आणि देशाच्या पक्षीय राजकारणातील महत्व अधोरेखीत होते. कमळ बहुगुणी असल्याचे आयुर्वेदानेही स्पष्ट केले आहे.नवदुर्गेला कमळ फुल वाहण्याची प्रथा असल्याने नवरात्रोत्सवात भक्तांकडून ते वाहण्याला प्राधान्य दिले जाते. डहाणू तालुक्यातील विविध गावांमधील तलावात उमललेल्या कमळाचे दृश्य पाहून मन मोहून जाते. बोर्डी परिसरातील तलावात बहुरंगी फुले दिसतात. कमळाच्या लाल व उपल्या दोन जाती आढळतात. पाने गुळगुळीत, खाली लवदार असून देठ लाल नारंगी रंगाचा असतो. ही कमळ सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पान वर्तुळाकार असून पानाच्या खालच्या बाजूस ठिपके असतात. जांभळी, फिकट, निळी, पांढरी, गुलाबी इ. विविधरंगी फुलांना मंद सुवास असतो. नवरात्रोत्सवात पूजेकरीता भक्तांकडून कमळांची मागणी वाढविली आहे. डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदीराप्रमाणेच अन्य मंदिराच्या समोर कमळ फुलांची विक्री करणाऱ्या आदिवासींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिसरातील तालवातून कमळांची फुल गोळा करून त्यांची डहाणू रेल्वे स्थानक, मुख्य रस्ता, सार्वजनिक स्थळी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे नरपड येथील लक्ष्मण वावरे या आदिवासी गृहस्थाने सांगितले. (वार्ताहर)कमळ फुलांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध होतो. त्याच्या बियांचा वापर होम हवनकरीता तर कंद खाण्यासाठी उपयोगात आणतात.- लक्ष्मण वावरे (स्थानिक आदिवासी कमळ फुल विकणारा