शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिका कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदानासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 23:27 IST

Vasai-Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेची दि. २८ जून रोजी मुदत संपल्याने तेव्हापासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने या वेळी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न कर्मचारीवर्गाला पडला आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाला या वर्षी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिकारी-कर्मचारी संघटनेने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे याकरिता बविआ अध्यक्ष तथा वसईचे आ. हितेंद्र ठाकूर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना साकडे घातले आहे.वसई-विरार महानगरपालिकेची दि. २८ जून रोजी मुदत संपल्याने तेव्हापासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने या वेळी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न कर्मचारीवर्गाला पडला आहे. दिवाळी सण तोंडावर आला असताना कोरोनाच्या काळात पालिका कर्मचारीवर्गाने दिवस-रात्र काम केले असून त्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी वसई-विरार महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. व वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या दोघांनाही मागणीबाबतचे निवेदन सादर केले आहे. लोकप्रतिनिधींच्या काळात कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व्यवस्थितपणे मिळत होते. त्यामुळे या वेळीही हे अनुदान मिळावे, अशी मागणी अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. महापालिका आयुक्त गंगाथरन डी. आणि आ. हितेंद्र ठाकूर यांना भेटलेल्या कर्मचारी वर्गातील शिष्टमंडळात अध्यक्ष सुधाकर संखे, संजू पाटील, खजिनदार स्मिता भोईर, मेरी डाबरे, कल्पेश पाटील, उमेश म्हसणेकर होते. या वेळी आ. हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आपण या प्रश्नात नक्कीच लक्ष घालू असे सांगितले. 

आयुक्तांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्षमाजी महापौर प्रवीण शेट्टी यांनीही कर्मचाऱ्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात चांगले काम केले असून त्यांना इतर महापालिकांप्रमाणेच अनुदान देण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे स्पष्ट केले. आता आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबतीत कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार