शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्या मनमानी, सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:32 IST

जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत

पालघर : जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत. त्या मध्ये मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि उपशिक्षकांची ७ हजार १०३ पदं मंजूर असून त्यापैकी ६ हजार ४३८ कार्यरत असल्याने ६६५ रिक्तपदं आहेत. विकल्पानुसार २४९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्यापैकी केवळ २२६ शिक्षक हजर झाल्याने २३ जागा आजही रिक्त आहेत. जिल्हा निर्मितीला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतांना या आदिवासी जिल्ह्यात शिक्षकांची सर्व पदं भरलेली नाहीत. या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्ह्याचे शिक्षण समिती सभापती सचिन पाटील सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र ग्राम विकास विभागाचच्या आदेशानुसार २२९ शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी गुरु वारी त्याची अंमलबाजवणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही अमलबजावणी झाल्यास केवळ ४९ शिक्षक परजिल्ह्यातून येणारे असतील. त्यामुळे आठ तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही शासन निर्णयाच्या अंमलबजावणी आधी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्र वारच्या स्थायी समिती सभेत सदर शासन निर्णयाची अंमलबाजवणी न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून जिल्हा शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केल्याचे लोकमतला सांगितले. जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदं रिक्त असताना हा निर्णय शैक्षणिक धोरणाला मारक आहे.शिवाय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाचे अधिकारी निर्णय घेत असल्याने स्थायी समितीच्या सभेतून अध्यक्षासह सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपलं निषेध नोंदविला आहे.