शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी साईधामचा वर्धापनदिन ; तयारीला झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:03 IST

मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे.

वसई : विरार पश्चिम, गावठाण रोड येथे असलेल्या ओम श्री साईधाम मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन सोहळा १२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. समस्त विरारवासीयांसाठी मायेची सावली देणारे कृपाछत्र अशी किर्ती असलेल्या या साईनाथांच्या मंदिर वर्धापनिदनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे तसेच भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकड आरती, श्रींचेमंगलस्नान महा अभिषेक, मंगल आरती, ग्रहयज्ञ, सत्यनारायण महापूजा, मध्यान्ह आरती, भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे.विरार पश्चिमेला गावठाण येथे १२ फेब्रुवारी १९८७ रोजी या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. मागील काही वर्षात मंदिर वर्धापन दिन सोहळा हा विरारचा जणू उत्सव बनून गेला आहे. गेल्या ३१ वर्षांत ओम श्री साईनाथ मंदिर ट्रस्टने अनेक धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक उपक्र म मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत. आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टमार्फत वर्षभर सुरू असते.विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून वर्धापनिदनाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद हा साईभक्तांनी आपल्या घरी बनविलेल्या प्रासादातून देण्यात येतो. विविध जाति-धर्माचे साईभक्त आपला पारंपारिक वेष परिधान करु न यावेळी उपस्थीत असतात. साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरार पश्चिम गावठाण परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात येत असते. राजकिय नेते मंडळी, हिंदी-मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत अभिनेते, मराठी कलाकारांची उपस्थिती प्रतिवर्षी असते. भजन संध्या व संगीत रजनीसाठी हजारो लोक उपस्थित असतात. विरार पश्चिम स्टेशन ते मंदिरापर्यंतच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट मार्फत विविध उपक्रम पालघर जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही राबविले जात आहेत.श्री साईधाम मंदिर ट्रस्टचे उपक्र मसन २००८ साली ट्रस्टच्या मार्फत शिर्डी येथील निमगांव, निघोज येथे भव्य स्वरूपात पालखी आणि पदयात्रींसाठी साई पालखी निवारा बांधण्यात आला आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यातून तसेच संपूर्ण देशभरातून साई पालखी निवारा येथे आतापर्यंत हजारो साईनाथांच्या पालखींचे आगमन व लाखो पदयात्री भक्तांनी निवासाचा लाभ घेतला आहे. या निवाºयात शिर्डीत पालखी आणि पदयात्रेतून येणाºया भाविकांची चहा, नाश्ता, जेवण, निवास तसेच आंघोळीसाठी गरम पाणी अशी सोय विनामूल्य केली जाते. येणाºया भाविकांना आध्यात्मिक मनशांती अनुभवण्यासाठी ध्यानकेंद्र, प्रशस्त गोशाळा, देशी-विदेशी पक्षांसाठी आधिवास क्षेत्र, अद्ययावत मत्स्यालय, उद्यानात मुलांसाठी खेळाचे साहित्य उभारण्यात आले आहे. पालखी निवारा परिसरात शंकर, पंचमुखी हनुमान, महादेव, विठ्ठल व गणेशाच्या भव्य संगमरवरी मूर्त्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार