शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

साहेब, तुम्ही आलात म्हणून आज पाणी आले हो...

By admin | Updated: July 30, 2016 04:35 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपये योजनेसाठी खर्चूनही पाण्याची स्थिती अतिशय गंभीर असून प्रकल्पग्रस्तांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्थितीची पाहणी सूरू करण्यात आली असून सलग दोन दिवस ही पाहणी करण्यात येणार आहे.पालघरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, महाराष्ट्र जीवनप्राधीकरण पालघरचे उपअभियंता एस.एन. कसबे, कार्यकारी अभियंता एम.जी. गीरगावकर, एम.आय.डी.सी.चे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा पालघरच्या तहसीलदार स्रेहल कतिचे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोफरणचे सरपंच रविंद्र मोरे, उपसरपंच सचिन ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, विरेंद्र पाटील, विजय तामोरे, गणेश कोरे, अजित पाटील, शेखर तामोरे आणि प्रकल्पग्रस्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळपासून पाणी योजनेची संयुक्त पाहणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज संपूर्ण दिवसात पोफरण तर उद्या अक्करपट्टीची तपासणी होणार आहे.आज प्रथम पोफरण गावातील ७५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरण्यात आली आणि त्यानंतर विभागानुसार पोणी सोडण्यात आले. त्या प्रत्येक झोनमध्ये उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी संपूर्ण तपासणी पथकासह व्यक्तीश: त्या भागातील बहुसंख्य घरात जाऊन पाण्याच्या स्थितीची पाहणी केली. त्यावेळी काही भागांमध्ये पाणी येत होते, काही ठिकाणी येत होते. परंतु पुरेसे पाणी येतच नव्हते.दावभट यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी व्यथा मांडताना आमची सोन्यासारखी घरेदारे, जमीनी देऊन आम्हाला पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सुषमा संदेश मोरे या महिलेने तर तीन वर्षांत आज प्रथम पाणी आल्याचे सांगितले. काहींनी अनेक दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागते असे सांगितले तर काहींनी साहेब, आज तुम्ही आले आहात म्हणून पाणी आल्याची भावना व्यक्त केली. पाण्याच्या पाइप जराही उंचीवर नेला तर पाण्याचा दाब नसल्याने पाणी येत नसल्याचे प्रत्यक्ष दाखविले. अशा पाण्याबाबतच्या वेगवेगळ्या समस्या व चित्र पहावयास मिळाले. (वार्ताहर)