शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 23:13 IST

अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज

तलासरी : अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे रास्तारोको आंदोलन केले.राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हापरिषद सदस्य काशिनाथ चौधरी, तसेच राजु पारेख इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. उधवा मोडगाव हळदपाडा हा रस्ता १५ टन वजनाच्या क्षमतेचा परंतु या मार्गावरून ४० टन वजनाच्या गाड्या टोल चुकविण्यासाठी जात असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहने चालविणे वाहन चालकांना अशक्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक वेळा येथे रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलने करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत दुरूस्तीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. जनताही भोळीभाबडी अािध्काऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत वारंवारच्या अधिकाऱ्यांच्या फसवेगीरीला कंटाळलेल्या व रस्त्याच्या दयनीय अवस्थेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी आज प्रखर आंदोलन करून वाहतुक बंद पाडली. यावेळी कासा पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.आंदोलनकर्त्यांचे प्रखर रुप लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता तोटावर घटनास्थळी येऊन तत्काळ रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतो असे सांगुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आजपर्यंतची अधिकाऱ्यांची फसवेगिरी पाहता आंदोलनकर्ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते यावेळी कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी मगर यांनी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात समेट घडवून आंदोलन मागे घेण्यास लावले. उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन बळीही पडले आहेत. आजारी माणसाला या मार्गावरून नेणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे आहे.दोन वर्षात या मार्गावर पावसाळ्यापुर्वी वा पावसाळ्यानंतरची कोणतीही दुरूस्तीची कामे करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी वारंवार प्रस्ताव पाठवुन प्रस्ताव मंजुर होत नसल्याने रस्ता दुरूस्ती रखडली आहे. त्यामुळे या दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताच रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे उपअभियंता तोटावर यांनी सांगितले. (वार्ताहर)या मार्गावर लाखोचा निधी खर्च होऊनही रस्त्याची दुर्दशा कायम आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने आंदोलन करण्यात आले. ८ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास वृक्ष लागवड खड्ड्यात करण्यात येणार आहे.- काशिनाथ चौधरी, मोडगाव, जिल्हापरिषद सदस्य - पालघरतात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ता दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- तोटावर, उपअभियंता सा. बां. विभाग - डहाणूउद्यापासूनच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतो.-निलेश सांबरे, ठेकेदाररस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात नेहमी होतात गस्त घालणे अवघड झाले आहे.- कासा पोलीस स्टेशन कर्मचारी