शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रूपाली अजूनही सर्जिकली अनफिटच

By admin | Updated: April 24, 2017 23:44 IST

चहाडे येथील रुपाली वरठा ह्या नऊ वर्ष्याच्या अपघातग्रस्त मुलीची उपचारा अभावी होणारी फरफट या लोकमतच्या वृत्ताची दखल सोमवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी घेऊन

हितेन नाईक/निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेचहाडे येथील रुपाली वरठा ह्या नऊ वर्ष्याच्या अपघातग्रस्त मुलीची उपचारा अभावी होणारी फरफट या लोकमतच्या वृत्ताची दखल सोमवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी घेऊन तिच्या उपचारा बाबत हलगर्जी करणाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.रुपालीला २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता विजेचा शॉक लागल्या नंतर तिला प्रथम उपचारासाठी मासवण च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्या नंतर तेथे तात्पुरते उपचार देऊन तिला ग्रामीण रु ग्णालय पालघर मध्ये आणण्यात आले. तेथेही प्राथमिक उपचार करून तेथून ढवळे रु ग्णालयात पाठविण्यात आले. तेथे जखमा पाहून पुढे मुंबई किंवा गुजरात येथील रु ग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रु ग्णवाहिका नसल्याचे कारण देत तिला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तिची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड पाहता तिच्या नातेवाईकांनी पैशाची जमवाजमव करीत खाजगी रुग्णवाहिकेने ठाण्याच्या जिल्हा रु ग्णालयात नेले होते.गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे उपचारार्थ अतिदक्षता विभागात दाखल असलेली रुपाली शुद्धीवर आली असून ती मेडिकली फिट असल्याची सुखद माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, विजेचा विद्युत प्रवाह माठ्या प्रमाणात रु पालीच्या शरीरातून गेल्याने ती भाजली आहे व त्यामुळे तिला झालेल्या जखमा खोलवर असल्याने रु पाली सर्जिकली अनिफट असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्जिकली उपचारासाठी रुपालीला नायर मधील नवीन इमारतीच्या ६ व्या मजल्यावरील बर्न केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले असून तज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करणार आहेत. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर तिची प्रकृती स्थिरावली असल्याचे समजते.पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जन पाडा-वरचा पेठा येथे राहणाऱ्या व जि. प. शाळेत तिसरीत शिकणाऱ्या रूपलीला २० एप्रिल रोजी विजेच्या तारेचा जोरदार झटका बसला होता तद्नंतर १२ तासांनी जवळपास चार रु ग्णालय फिरल्यानंतर मुंबईतील नायर रु ग्णालायात तिच्यावर खऱ्या अर्थाने उपचार सुरु झाले. तिथे ती उपचारा दरम्यान, बेशुद्धावस्थेत होती. मात्र , डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या औषोधोपचारानंतर ती शुद्धीवर आली आहे. असे असले तरी जिवंत वीजवाहिनीच्या मोठ्या प्रवाहामुळे रु पाली ३५ टक्क्याहून अधिक भाजली असल्याने तिच्या शरीरावरखोलवर जखमा झालेल्या असून तिला त्यासाठी पुढल्या उपचारासाठी प्लास्टिक सर्जन च्या देखभालीखाली ठेवण्यात येणार आहे व गरज असल्यास तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.